उत्तर प्रदेशातील लखनौ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एचडीएफसीच्या विभूतीखंड शाखेच्या अतिरिक्त उपाध्यक्ष ४५ वर्षीय सदफ फातिमा यांचा मंगळवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. यावर आता विभूतीखंडचे निरीक्षक सुनील कुमार सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदफ वजीरगंजची रहिवासी होती. मंगळवारी दुपारी तीन वाजता त्या कार्यालयात काम करत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर त्या अचानक खुर्चीवरून खाली पडल्या. सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना लगेच तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबाकडून तक्रार आल्यास पुढील कारवाई केली जाईल.
एचडीएफसी बँकेत महिला अधिकारी खुर्चीवरून खाली पडल्या बँक कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे कारण सांगितले जात आहे. कामाच्या जास्त दबावामुळे महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे सहकारी कर्मचारी करत आहेत. सदफ फातिमा एचडीएफसी बँकेच्या अतिरिक्त उप-उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या बँकेची शाखा लखनऊच्या गोमती नगर येथील विभूती खंड शाखेत आहे, तिथे ही घटना घडली. कार्यालयाच्या आवारात त्या खुर्चीवरून पडल्याची माहिती बँकेतील त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये लिहिले की, "लखनऊमध्ये कामाचा ताण आणि तणावामुळे कार्यालयात खुर्चीवरून पडून महिला HDFC कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. लखनऊमध्ये कामाचा ताण आणि ताण पडून मृत्यूची बातमी अत्यंत चिंताजनक आहे.
अशा बातम्या हे देशातील सध्याच्या आर्थिक दबावाचे प्रतीक असल्याचेही अखिलेश यादव यांनी लिहिले आहे. या संदर्भात सर्व कंपन्यांनी आणि अगदी सरकारी विभागांनाही गांभीर्याने विचार करावा लागेल. हे देशाच्या मानव संसाधनाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. अशा आकस्मिक मृत्यूमुळे कामाच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. कोणत्याही देशाच्या खऱ्या प्रगतीचे मोजमाप हे सेवा किंवा उत्पादनांच्या संख्येत वाढ नसून माणूस किती स्वतंत्र, निरोगी आणि आनंदी आहे हे आहे, असंही पोस्टमध्ये म्हटले आहे.