EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 07:38 PM2018-12-01T19:38:58+5:302018-12-01T19:40:34+5:30

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. मात्र 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

Suspicious on the EVM, the Congress leader meet election commission | EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव 

EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव 

Next
ठळक मुद्दे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.आज काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निकाल बदलवण्यासाठी छडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला

नवी दिल्ली - मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. मात्र 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निकाल बदलवण्यासाठी छडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच इव्हीएमच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी आणि मनीष तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. तसेच दोन वेगवेगळी पत्रके निवडणूक आयोगाला सोपवली. तसेच या राज्यांमधील निवडणूक निकाल आणि मतमोजणी प्रभावित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली. तसेच मध्य प्रदेशमधील निवडणुकीचे निकाल बदलवण्यासाठी इव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छडयंत्र रचण्यात येत असल्याचाही आरोप काँग्रेसने केला. 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी इव्हीएममध्ये होऊ शकणाऱ्या छेडछाडीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.  

Web Title: Suspicious on the EVM, the Congress leader meet election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.