काँग्रेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आता पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. यानंतर आता भाजपने काँग्रेसच्या या यात्रेवर विशाणा साधायला सुरवात केली आहे. यापूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सूचनेवरून राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 जानेवारीला राहुल गांधींना भगवान शंकरांच्या मंदिरातही प्रवेश करता आला नाही. तर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले आहेत. शुभेंदू अधिकारी बोलण्याच्या ओघात एवढे उत्तेजित झाले की त्यांनी कॅमेऱ्या समोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले. यानंतर, काँग्रेसने सुवेंदूंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.
पश्चिम बंगाल काँग्रेस पक्षाचे सचिव सुमन रॉय चौधरी आणि पक्षाचे राज्य युनिट प्रवक्ते अभिषेक बॅनर्जी यांनी रायगंज पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार तथा विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या असभ्य वक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर, सुवेंदू यांनी "बिनशर्त माफी" मागावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे.
काय म्हणाले सुवेंदू -राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रे'संदर्भात भाष्य करताना सुवेंदू अधिकारी यांनी राहुल गांधींसंदर्भात अश्लील शब्द वापरला. पत्रकार रविवारी सुवेंदू यांच्यासोबत बोलत असताना हा प्रकार घडला. सुवेंदू म्हणाले, "मी गेल्या चार दिवसांपासून राहुल गांधींसंदर्भात ऐकत आहे. ते कोण आहेत? एक *****. ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, ते सकाळी चाहा तयार करण्यासाठी स्टोव्हवर कोळशाचे तुकडे ठेवतात. खरचं! सुवेंदू अधिकारी हसत म्हणाले, ''चुल्हीवर कोलसा टाकला जाऊ शकतो. हे माझी माहिती अथवा माझ्या माहिती पलिकडचे आहे."