मंगळवेढय़ाचा स्वच्छ भारत अभियानात समावेश
By admin | Published: September 07, 2015 11:27 PM
मंगळवेढा :
मंगळवेढा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाने जाहीर केलेल्या 50 नगरपालिकांमध्ये मंगळवेढा शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आता स्मार्ट सिटी होणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ ही संकल्पना सुरू केली. या संकल्पनेमध्येच सन 2018 पर्यंत राज्यातील 285 नगरपालिका आणि मोठी गावे हागणदारीमुक्त करून स्मार्ट सिटी करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. शासनाकडून देखील हागणदारीमुक्तीची संकल्पना पूर्ण करण्यासाठी राज्यातून निवडलेल्या 50 स्मार्ट शहरांमध्ये मंगळवेढा तालुक्याचा समावेश केला जात आहेमंगळवेढा नगरपालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाकडे शहराचा सव्र्हे पाठवून दिला होता. मंगळवेढा शहरात सध्या पंचवीस हजार लोकसंख्या असून, शहरात 4450 इतकी कुटुंबसंख्या आहे. परंतु यापैकी केवळ सतराशे जणांकडे शौचालये असून, 2750 लोकांकडे शौचालये नाहीत. यातील 545 कुटुंबे ही उघड्यावर शौचास जातात़ या प्रकल्पांमुळे शहरातील स्वच्छता वाढीस लागून नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहणार आहे. या कामासाठी शासनाकडून निधीदेखील मिळणार असल्याने नगरपालिकेला आर्थिक अडचण येणार नाही. कोट ::::::::::::::::::::::मंगळवेढा ही संतांची भूमी असून, ही भूमी 100 टक्के हागणदारीमुक्त करुन स्वच्छ व सुंदर करण्यासाठी माझा पूर्ण प्रय} राहणार असून, शहरास स्मार्ट करण्यासाठी जनतेच्या सहभागाची आवश्यकता आहे.- आशिष लोकरेमुख्याधिकारी, मंगळवेढा नगरपालिका. कोट ::::::::::::::::::::मंगळवेढा शहराचा स्वच्छ भारत अभियानात समावेश झाला, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. शासनाच्या मदतीने या संकल्पनेमधून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रय} सुरु असून, ते ठरलेल्या मुदतीत हागणदारीमुक्त होईल. - अरुणा दत्तूनगराध्यक्षा, मंगळवेढा नगरपालिका