Swachh Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (1 ऑक्टोबर) स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Mission) श्रमदान केले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत '75 दिवसांचे हार्ड चॅलेंज' पूर्ण करुन सोशल मीडिया स्टार झालेला अंकित बैयनपुरियादेखील (ankit baiyanpuria) होता. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्वच्छता मोहिमेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओते पीएम मोदी आणि अंकित श्रमदान करताना दिसत आहे.
पीएम मोदी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या मोहिमेअंतर्गत लोकांना त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जाते. लोकांनी केवळ परिसरच स्वच्छ ठेवू नये, तर पर्यावरणाचे रक्षणही करावे, असा या अभियानाचा उद्देश आहे. दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
PM मोदींचा व्हिडिओ:-
व्हिडिओमध्ये काय आहे?व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींनी म्हटले की, 'आज संपूर्ण देश स्वच्छतेकडे लक्ष देत आहे. मी आणि अंकित बैयनपुरियाने या अभियानात भाग घेतला. स्वच्छतेसोबतच आम्ही फिटनेस आणि आरोग्यावरही चर्चा केली.' व्हिडिओच्या सुरुवातीला पीएम मोदी म्हणतात, 'राम-राम साऱ्याने.' यावेळी पीएम मोदींनी अंकितला विचारले, तू फिटनेससाठी खूप मेहनत करतोस. त्यात ही स्वच्छता मोहीम कशी मदत करेल? याला उत्तर देताना अंकित म्हणतो, पर्यावरण स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. पर्यावरण स्वच्छ राहिले तरच आपण निरोगी राहू.
पीएम मोदींनी अंकितला विचारतात, सोनीपतच्या गावांमध्ये स्वच्छतेबाबत लोकांचा दृष्टिकोन काय आहे? यावर अंकित म्हणतो की, आता लोकांनी याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. पीएम अंकितला त्याच्या व्यायामाबद्दल विचारतात. याला उत्तर देताना अंकितने सांगितले की, तो दिवसातून चार ते पाच तास व्यायाम करतो. तसेच, तुमच्यापासून प्रेरित असल्याचे अंकितने पंतप्रधानांना सांगितले. यावेळी सोशल मीडियाचा सकारात्मक पद्धतीने वापर केल्याबद्दल पीएम मोदी अंकितचे कौतुकही करतात.