नवी दिल्ली : आर्य समाजाचे नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन झाले. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी अग्निवेश यांना सोमवारी नवी दिल्लीतील लिव्हर अँड बायिलरी सायन्सेस (आयएलबीएस) मध्ये दाखल करण्यात आले होते.
स्वामी अग्निवेश यांच्या निधनाची बातमी आयएलबीएसकडून देण्यात आली. यावेळी स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु हे शक्य झाले नाही. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे आयएलबीएसकडून सांगण्यात आले.
स्वामी अग्निवेश यांना यकृतासंबंधी त्रास होत होता. गेल्या मंगळवारपासून त्यांच्या शरिरातील प्रमुख अवयवांनी कार्य करणे बंद केल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून होती. परंतु अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
सामाजिक मुद्द्यांवर आग्रही भूमिका मांडणाऱ्या स्वामी अग्निवेश यांनी १९७० मध्ये आर्य सभा नावाची राजकीय पार्टी स्थापन केली होती. १९७७ मध्ये ते हरयाणा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण आले होते आणि त्यावेळी हरयाणा सरकारमध्ये शिक्षण मंत्री सुद्धा होते. त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी बंधुआ मुक्ति मोर्चा नावाची संघटना स्थापन केली.
स्वामी अग्निवेश यांनी २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर सरकारमध्ये बदल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या धोरणावर त्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली होती. सामाजिक हितासाठी त्यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला जाब विचारण्याचे काम केले. याशिवाय, बिग बॉस या रियालिटी शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.
आणखी बातम्या...
- Zomato देणार गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी, पुढील वर्षात IPO ची शक्यता
- Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट
- मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण
- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल
- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका
- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"
- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती