ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - नेहमी वादात राहणारे आणि स्वतःला संन्यासी म्हणवणारे ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबांना दिल्लीत मारहाण झाली. ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले ओम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलेच चर्चेत होते. नथुराम गोडसेच्या जंयतीनिमित्त राजानी दिल्लीत आयोजीत एका कार्यक्रमात ओम बाबांना मारहाण करण्यात आली.
दिल्लीतील विकासनगरमध्ये नथुराम गोडसेच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी बिग बॉसच्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबा यांना प्रमुख पाहुणे बोलावण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाला जमलेले नागरिक भडकले स्वामी ओम बाबाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आल्याचं पाहून संतापले.
अनेकांनी आयोजकांना कार्यक्रमातच खडे बोल सुनावत स्वामी ओम बाबांना कार्यक्रमातून हाकलून देण्यास सांगितले.पूनम नावाच्या एका महिलेने स्वामी ओम बाबांना कार्यक्रमात का बोलावले यावरून वाद घालायला सुरूवात केली. अशा पवित्र कार्यक्रमात ढोंगी बाबांना बोलावल्यास त्यांना चप्पलेने मारायला हवे, असे म्हटले. कार्यक्रम सुरू असताना अजय नावाच्या व्यक्तीने स्वामी ओम बाबांबद्दल बोलायला सुरूवात करताच बाबा उठून जात होते. मात्र, काही लोकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करीत त्यांना मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीनंतर स्वामी आपल्या गाडीतून जात असताना जमलेल्या लोकांनी गाडीला घेराव घातला. संतापलेल्या नागरिकांनी स्वामी ओम बाबांच्या गाडीचीही तोडफोड केली. या हल्ल्यात गाडीचा चालक जखमी झाला.
यापुर्वी 14 जानेवारीला एका टीव्ही चॅनलच्या लाइव्ह शोमध्ये स्वामी ओम बाबाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती.