ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या नागरिकांकडून ट्विटरवर मांडल्या जाणा-या समस्या सोडवण्यासाठी ओळखल्या जातात. लोकांना मदत करण्यासाठी सुषमा स्वराज सोशल मीडियाचा चांगला उपयोग करतात, हे सर्वांनाच माहिती आहे.
याद्वारे स्वराज परदेशात फसलेल्या नागरिकांना किंवा पासपोर्ट न मिळणा-यांना मदत करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पती कौशल यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला. मात्र, सुषमा यांना त्यांचे पती ट्विटरवर फॉलो करत नाही, ही वेगळीच गोष्ट. यावर एका ट्विटर यूजरने कौशल यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांचे उत्तर वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
अंकू त्यागी नावाच्या ट्विटर यूजरने स्वराज कौशल यांचा विचारले की, सर तुम्ही सुषमा स्वराज यांना ट्विटरवर फॉलो का करत नाही ?. यावर कौशल यांनी उत्तर दिले की, कारण मी लीबिया किंवा येमेनमध्ये फसलेलो नाही. कौशल यांच्या या उत्तरावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजरने लिहिले की, आनंदी वैवाहिक जीवनासाठी, सर्व जोडप्यांनी एकमेकांना फेसबुक आणि ट्विटवर ब्लॉक केले पाहिजे.
यापूर्वी एका युजरने कौशल यांना 'तुम्ही सुषमा स्वराज यांनी शेवटचे कधी भेटला होतात?', असा प्रश्न केला होता. यावेळी कौशल यांनी त्याला असे उत्तर दिले की त्याची बोलतीच बंद झाली. 'तुम्ही आरटीआय एक्टिव्हिस्ट आहात का?', असे उत्तर देऊन कौशल यांनी त्याला जशास तसे उत्तर दिले.
एका व्यक्तीने स्वराज दाम्पत्याची स्तुती करत म्हटले होते की, 'तुमच्या दोघांकडेही चांगली विनोदबुद्धी आहे. तुम्ही दोघंही फार धम्माल करत असाल'. यावर 'गेल्या 42 वर्षांपासून ही कॉमेडी सुरू आहे', असे उत्तर कौशल यांनी दिले. लक्ष्य अडवाणीने विचारले होते की, 'सर मी तुमचा खूप आदर करतो. बस इतके जाणून घ्यायचे होते की सर्व ठिक आहे ना? सुषमा स्वराज आज ट्विटरवर सक्रिय नाहीत. सर्व ठिक आहे अशी आशा करतो'. यावर 'जर त्या ट्विट करत नाहीत याचा अर्थ सर्व ठिक आहे', असे मजेशीर उत्तर कौशल यांनी लक्ष्यला दिले.
Because I am not stranded in Libya or Yemen. https://t.co/nLB5scht3j— Governor Swaraj (@governorswaraj) February 17, 2017
Because I am not stranded in Libya or Yemen. https://t.co/nLB5scht3j— Governor Swaraj (@governorswaraj) February 17, 2017
The comedy is on for 42 years now. https://t.co/VAaqULqN5Y— Governor Swaraj (@governorswaraj) February 16, 2017