शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

स्वराज, राजेंना दिलासा

By admin | Published: June 19, 2015 11:08 PM

मुंबईसह देशाच्या अन्य भागात पावासाने हाहाकार उडाला असला तरी ललित मोदी प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विदेशमंत्री सुषमा स्वराज

हरिश गुप्ता, नवी दिल्लीमुंबईसह देशाच्या अन्य भागात पावासाने हाहाकार उडाला असला तरी ललित मोदी प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना दिलासा मिळाला आहे. भाजपने अखेर मौन सोडत स्वराज आणि राजे यांची पाठराखण करीत दोघींच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली. ललित वादळाचा जोर ओसरला, असे दिसत असले तरी संसदेच्या पावसाळी अधिवेशात पुन्हा या वादळाला उफाण येण्याची चिन्हे आहेत. सुषमा आणि राजे यांना पदावरून न हटविल्यास पावसाळी अधिवेशन चालू न देण्याचा स्पष्ट इशारा काँग्रेसने दिला आहे.गेल्या पाच दिवसांपासून केंद्र सरकारभोवती ललित मोदी प्रकरणाचे वादळ घोंगावत होते. एवढेच नाही तर चोवीस तास चालणाऱ्या न्यूज चॅनलवरही भाजपच्या या दोन्ही महिला नेत्यांच्या राजकीय भवितव्यावरून चर्चेचे पेव फुटले होते.एकीकडे काँग्रेसने जयराम रमेश यांना मैदानातून उतरवून हा सगळा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांच्या संगनमताने खेळला जात असल्याचा आरोप करून या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. तोच राजस्थान प्रदेश भाजपही तेवढ्याच आक्रमकपणे राजेंच्या समर्थनार्थ सरसावली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर ललितमोदी प्रकरणाचे पडसाद उमटणार असले तरी, आजघडीला मात्र भाजपवरील दडपण काहीसे कमी जरुर झाले आहे. भारतात आपल्यावरून काहूर उठल्यानंतर ललित मोदीसुद्धा लंडनमध्ये तोंडावर बोट धरुन आहेत. सक्तवसुली संचालनालय व इतर तपास संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लागणार असल्यानेच त्यांना गप्प राहणे भाग पडले आहे.पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरविण्यासाठी संसदीय कामकाज व्यवहार समितीची २३ जून रोजी बैठक होत आहे. २० जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी रात्री या वादावर चर्चा केली. काँग्रेसच्या दडपणापुढे नमते घेण्याऐवजी पक्षपातळीवरच काय तो निर्णय घेणेच, ईष्ट ठरेल, अशा निष्कर्षाप्रत दोघांतील चर्चा झाली.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी सुषमा स्वराज उद्या (शनिवारी) न्यूयॉर्कला जाणार आहेत. राजकीय सूडाचा आरोप...कोच्ची फ्रँचायजीत शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांची हिस्सेदारी असल्याचा भंडाफोड टिष्ट्वटवरून केल्याने राजकीय वादळ उठले होते. काँग्रेसही अडचणीत आली होती. विरोधकांनी रान उठविल्याने अखेर शशी थरूर यांना विदेश राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. याचा राजकीय सूड घेण्यासाठी तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी माझ्या मागे ईडीची चौकशी लावली, असा आरोप ललित मोदी यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.काँग्रेसने मात्र राष्ट्रपती मुखर्जींवर करण्यात आलेला हा आरोप निंदनीय असल्याचे म्हटले आहे.- काँग्रेसने ललित मोदी प्रकरणाला नवे वळण देत शुक्रवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढविला. छोटे मोदी आणि मोठे मोदी यांच्या संगनमताने हे सर्व प्रकरण घडत आहे, असा आरोप काँग्रेसने केला.- पंतप्रधान मोदींना आपले सरकार आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनात स्वत:चा बचाव करायचा असेल तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याचा इशारा काँग्रेसने दिला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले.