Swaroopanand Saraswati: हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 05:28 PM2022-09-11T17:28:12+5:302022-09-11T17:28:29+5:30
Swaroopanand Saraswati: स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी वयाच्या 99व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Swaroopanand Saraswati: हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन झाले आहे. शंकराचार्य यांनी वयाच्या 99व्या वर्षी नरसिंगपूर येथे अखेरचा श्वास घेतला. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात त्यांचा जन्म झाला होता आमि वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी धार्मिक कार्यासाठी घर सोडले.
परमहंसी गंगा आश्रम झोतेश्वर जिल्हा नरसिंगपूर येथे आज दुपारी 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन शंकराचार्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठीही त्यांनी प्रदीर्घ कायदेशीर लढाही लढले. काही दिवसांपूर्वीच स्वामीजींचा 99वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
Dwarka Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati passes away at the age of 99, in Madhya Pradesh's Narsinghpur
— ANI (@ANI) September 11, 2022
(file pic) pic.twitter.com/Bzi541OiPW
स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान
वयाच्या 9व्या वर्षी जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी घर सोडून तीर्थयात्रा सुरू केली होती. या दरम्यान ते काशीला पोहोचले आणि ब्रह्मलीन श्री स्वामी कर्पात्री महाराज वेद-वेदांग आणि शास्त्र शिकले. हा तो काळ होता जेव्हा देश इंग्रजांविरुद्ध लढत होता.
देशात आंदोलने झाली, गांधीजींनी 1942 मध्ये भारत छोडोचा नारा दिला, तेव्हा स्वामींनीही स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यावेळी ते 19 वर्षांचे होते. या वयात ते 'क्रांतिकारक साधू' म्हणून ओळखले गेले. यादरम्यान त्यांनी नऊ महिने वाराणसीच्या तुरुंगात आणि सहा महिने मध्य प्रदेशच्या तुरुंगात काढले.