नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांच्या जामीन याचिकेवर सोमवारी (२७ मे) तीस हजारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विभव कुमार यांचे वकील हरी हरन यांनी युक्तिवाद केला. स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश केला होता. त्रास देण्याचा त्यांचा हेतू होता. खासदार असल्याने त्यांना काहीही करण्याचे स्वातंत्र्य देता येत नाही, असे वकील हरी हरन म्हणाले.
दरम्यान, राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी स्वाती मालीवालही उपस्थित होत्या. विभव कुमार यांचे वकील हरी हरन यांनी सांगितले की, स्वाती मालीवाल यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आयपीसीचे कलम ३०८ लावण्यात आले आहे, ज्याची सुनावणी सत्र न्यायालयात होऊ शकते. एफआयआर पाहिल्यानंतर ही कलमे लागू होतात का? कलम ३०८ आयपीसी, हे देखील असे ठेवले आहे का? मुख्यमंत्र्यांच्या फोनवरून त्या परिसरात आल्याचे मालीवाल यांनी म्हटले नाही.
स्वाती मालीवाल या निवासस्थानात का घुसल्या असा सवाल वकील हरी हरन यांनी हे एकप्रकारे अतिक्रमणच असल्याचे म्हटले. अशा प्रकारे कोणी निवासस्थानात घुसू शकते का? त्यांच्या (मालिवाल) विरोधातही आम्ही अतिक्रमणाची तक्रार दाखल केली आहे. हे मुख्यमंत्र्यांचे निवास्थान आहे, असे कोणी येऊ शकते का? खासदार असल्याने तुम्ही काही करायला मोकळे आहात का? असेही वकील हरी हरन म्हणाले.
याचबरोबर, वकील हरी हरन यांनी न्यायालयात सांगितले की, तुम्ही खासदाराला बाहेर थांबवणार का? अशी विधाने करून त्या विभव कुमार यांना लगेच चिथावणी देण्याचे काम करत होत्या. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणी बोलावले? त्या मनात काहीतरी घेऊन आल्या होत्या. येण्यापूर्वी त्यांनी काहीतरी विचार केला होता. मग त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना वारंवार विचारले की विभव कुमार यांच्यांशी चर्चा केलीय का?