नवी दिल्लीः परदेशी बँकेत जमा असलेल्या काळ्या पैशासंदर्भात मोदी सरकारला मोठं यश मिळालं आहे. स्वित्झर्लंड सरकारनं भारताला स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांसंबंधीची माहिती सोपवलेली आहे. भारत हा त्या निवडक देशांमधील, ज्याला स्विस बँकेतील खात्यासंबंधी माहिती मिळालेली आहे. या माहितीनंतर केंद्र सरकारला पुढची माहिती 2020पर्यंत सोपवली जाणार आहे. स्वित्झर्लंडच्या टॅक्स विभागानं ही माहिती दिली आहे. यावेळी स्वित्झर्लंडमध्ये जगभरातल्या 75 देशांमध्ये जवळपास 31 लाख खाती असून, ती संशयास्पद आहेत. देशातल्या सरकारी यंत्रणेनं आता यासंदर्भात चौकशी सुरू केलेली आहे.खातेधारकांची चौकशी झाल्यानंतर त्यात खातेधारकांचं नाव, त्यांच्या खात्याची माहिती दिली जाणार आहे. पहिल्यांदाच भारताला स्वित्झर्लंडच्या एईओआयच्या अंतर्गत माहिती दिली आहे. या कायद्यांतर्गत वित्तीय खात्यांच्या माहितीची देवाण-घेवाण केली जाते. जी खाती वर्तमानात संशयास्पदरीत्या सक्रिय होती, ती खाती 2018मध्येच बंद करण्यात आलेली आहेत. एईओआयद्वारे मिळालेली माहिती गोपनीय असते. एफटीए अधिकाऱ्यांनी खात्यांची संख्या आणि स्विस बँकेतल्या भारतीय ग्राहकांशी संबंधित वित्तीय संपत्तीची माहिती देण्यास नकार दिला आहे.एफटीएनं भागीदार देशांची एकूण 3.1 मिलियन वित्तीय खातेधारकांची माहिती दिली होती. जवळपास 2.4 मिलियनची माहिती प्राप्त झाली आहे. परदेशातला काळा पैसा परत भारतात आणण्याचं मोदी सरकारसमोर मोठं आवाहन आहे. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं याचा मोठा मुद्दा बनवला होता. तसेच देशातील जनतेला काळापैसा परत आणण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यासाठी भारत सरकार लागोपाठ स्वित्झर्लंडच्या सरकारच्या संपर्कात आहे.
स्विस बँकेतल्या दोन भारतीय खातेधारकांची नावं समजली, काळ्या पैशांसंदर्भात भारताला मोठं यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 6:03 PM