लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी झाले. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर आहेत, राजस्थानमधील सभेत पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
"काँग्रेस हे अस्थिरतेचे प्रतीक आहे. आज काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत, अशी टीका मोदींनी केली. यावेळी मोदींनी केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजना, पीएम आवास यासह विविध योजनांची माहिती दिली.
"काँग्रेसच्या काळात सरकार रिमोट कंट्रोलने चालवले जात होते. त्यांचे नाव न घेता त्यांनी सोनिया गांधींवर निशाणा साधला आणि जे निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेतून विजयी करून वाचवले जात असल्याची टीकाही मोदींनी केली.आज देशातील तरुणांना काँग्रेसला तोंड द्यायचे नाही. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या हमींचा पुनरुच्चार केला.
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, राजस्थानची बाजरी जगाच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे. विकसित भारत आणि विकसित राजस्थानचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. भारताला जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनवायची आहे. 'जल जीवन मिशन' अंतर्गत प्रत्येक घरात नळाला पाणी पोहोचवण्याचे काम वेगाने पूर्ण होत आहे. राजस्थानमध्ये मागील गेहलोत सरकारने यातही घोटाळा केला होता, असा आरोपही मोदींनी केला.
"तुम्हाला प्रत्येक मतदान केंद्र जिंकायचे आहे. भाजपचा झेंडा प्रत्येक बूथवर असावा. लुम्बाराम यांना मत द्या म्हणजे मोदींना मत द्या. तुमचे प्रत्येक मत मोदींना मजबूत करेल. आपण लोकशाही साजरी करावी, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.