नवी दिल्ली : सिंडिकेट बँकेतील १००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने मंगळवारी तीन शहरांमधील दहा ठिकाणी छापे घातले.या घोटाळ्यात सामील असलेले बँकेचे काही वरिष्ठ अधिकारी आणि काही खासगी लोकांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर हे छापे घालण्यात आले, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.बनावट दस्तऐवज सादर करून बँकेचे कर्ज घेतल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात दिल्ली, जयपूर आणि उदयपूर येथील दहा ठिकाणी हे छापे घालण्यात आले, असे या सूत्रांनी सांगितले. तथापि या छाप्याबद्दलचा तपशील देण्यास मात्र या सूत्रांनी नकार दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सिंडिकेट बँक घोटाळा; ‘सीबीआय’कडून छापे
By admin | Published: March 09, 2016 5:06 AM