शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा भारतात दाखल; विमानतळावरुन NIA ने घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:32 IST

Tahawwur Rana News : तहव्वुर राणाला NIA च्या मुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

Tahawwur Rana News : मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले. त्याला घेऊन येणारे खास विमान आज दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. यानंतर त्याला विमानतळावरुन थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेले जात आहे. तिथे तपास संस्थांच्या पथकाकडून त्याची चौकशी केली जाईल. 

तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. आता अखेर या प्रयत्नांना यश आले अन् राणा भारतात दाखल झाला. अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केले. यानंतर त्याला एनआयए मुख्यालयात नेले जात असून, तिथे त्याची चौकशी केली जाईल. यानंतर तहव्वुर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. 

पाकिस्तानची पहिली प्रतिक्रियातहव्वुर राणा हा पाकिस्तानी लष्कर/आयएसआयचा सदस्य आहे. त्याची 26/11 हल्ल्याच्या कटात थेट होती. दरम्यान, आता राणाच्या प्रत्यार्पणाबाबत पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने तहव्वुर राणापासून स्वतःला दूर केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, "तहव्वुर राणाने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे त्याचे कॅनेडियन नागरिकत्व अगदी स्पष्ट आहे.

26/11 हल्ल्यात 166 जणांचा मृत्यूतहव्वुर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमनचा निकटवर्तीय होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने मुंबईतील रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्सवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 लोक मारले गेले होते. त्याच प्रकरणात नोव्हेंबर 2012 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाdelhiदिल्लीMumbaiमुंबई