संसदेत काँग्रेसने दिली तहकुबी सूचना; पाळतीची माहिती सरकारला होती?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 02:18 AM2020-09-16T02:18:28+5:302020-09-16T06:33:50+5:30
काँग्रेसचे खासदार मॅनिकाम टागोर आणि अधीर रंजन चौधरी यांनी पाळतीच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी ही नोटीस दिली.
नवी दिल्ली : चिनी कंपनी भारतात अनेक राजकीय नेत्यांसह १० हजारांपेक्षा जास्त लोकांवर पाळत ठेवत असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी संसदेत तहकुबी नोटीस दिली.
काँग्रेसचे खासदार मॅनिकाम टागोर आणि अधीर रंजन चौधरी यांनी पाळतीच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी ही नोटीस दिली. भारतातील प्रमुख दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या या पाळतीच्या बातम्यांचा उल्लेख टागोर यांनी केला. या बातम्यांत म्हटले आहे की, चीनचे सरकार आणि लष्कर राजकीय नेते, नोकरशहा, पत्रकार आणि वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रांतील लोकांवर लक्ष ठेवून आहे. ते ‘विदेशी लक्ष्यां’च्या त्याच्या जागतिक डाटाबेससाठी.
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सोमवारी यावर बोलताना हे पाळत प्रकरण म्हणजे ‘खोलवर सुरू असलेली कारवाई’ म्हटले. दहा हजार भारतीयांवर चीनचे अधिकारी लक्ष ठेवत आहेत, ही काही लहानसहान बाब नाही, असे थरूर म्हणाले. केंद्र सरकारने चीनचे हे हेतू उधळून लावण्यासाठी सायबर सिक्युरिटी वाढवली पाहिजे, असेही काँग्रेसने म्हटले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आणि एकही सुटी न घेता ते एक आॅक्टोबरपर्यंत चालेल.
पाळतीच्या बातम्या जर खºया असतील, तर मोदी सरकारला त्याच्या गांभीर्याची जाणीव आहे का? किंवा अशी काही हेरगिरी सुरू असल्याची माहितीच त्यांना नाही? सरकार आमच्या सीमांचे रक्षण करण्यात वारंवार का अपयशी ठरते आहे? अशा उद्योगांपासून चीनने दूर राहिले पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्याला दिला गेला पाहिजे, असेही सुरजेवाला म्हणाले.
शेंनझेनस्थित तंत्रज्ञान कंपनीचा संबंध चीनच्या सरकारशी, तसेच चीन कम्युनिस्ट पक्षाशी आहे.
चीनला स्पष्ट
संदेश देण्याची
गरज -सुरजेवाला
चीनकडून होत असलेल्या भारतीयांच्या पाळतीची माहिती नरेंद्र मोदी यांच्या सरकारला होती का, अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी केली. ते टिष्ट्वटरवर म्हणाले, चीनने अशा गोष्टींपासून दूर राहावे याचा स्पष्ट संदेश त्याला दिला गेला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
लडाखमध्ये चीनने प्रत्यक्ष सीमा रेषेवर भारताशी भांडण उकरून काढले व त्याचे भूभाग विस्तार करण्याचे प्रयत्न वाढलेले आहेत, या पार्श्वभूमीवर पाळतीचा विषय फार महत्त्वाचा बनला आहे.
सुरजेवाला यांनी गेल्या मे महिन्यात उद््भवलेला सीमा प्रश्न केंद्र सरकार अजून सोडवू शकलेले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.