शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
4
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
5
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
6
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
7
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
8
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
9
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
10
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
11
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
12
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
13
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
14
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
15
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
16
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
17
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
18
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
19
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
20
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!

स्वागतासाठी ताजमहाल सज्ज!

By admin | Published: January 24, 2015 2:12 AM

केवळ राजधानी दिल्लीतच नव्हे तर त्यांच्या ताजमहल भेटीसाठी आग्य्रातही जोरदार तयारी सुरू आहे. दिल्ली ते ताजमहल दरम्यान सुरक्षेची अपूर्व अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

नितीन अग्रवाल - नवी दिल्लीकेवळ राजधानी दिल्लीतच नव्हे तर त्यांच्या ताजमहल भेटीसाठी आग्य्रातही जोरदार तयारी सुरू आहे. दिल्ली ते ताजमहल दरम्यान सुरक्षेची अपूर्व अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषत: ताजमहल आणि त्याचा परिसर जणू लष्करी छावणीच बनला आहे. अध्यक्षीय कारकिर्दीत दुसऱ्यांदा भारताला भेट देणारे बराक ओबामा हे पहिलेच अध्यक्ष आहेत.ओबामा २७ जानेवारी रोजी पत्नी मिशेल हिच्यासोबत ताजमहलचे सौंदर्य बघतील. मंगळवारी ताजमहल सामान्य पर्यटकांसाठी बंद असेल, असे सूत्रांकडून समजते. परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार ओबामांभोवती १०० अमेरिकन सुरक्षा रक्षक असतील.शिवाय आग्रा आणि ताजमहलच्या जवळ जवळपास चार हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे वर्तुळ असेल. यात स्थानिक पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा समावेश आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान ताजमहलच्या चारही बाजुंनी आणि यमुना नदीत आतापासूनच गस्त घालत आहेत. खैरिया विमानतळापासून ताजमहलपर्यंतच्या ११ किलोमीटर रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.आग्राचे पोलीस महानिरीक्षक जॉन सुनील गुप्ता यांनी ओबामा यांच्या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस प्रथमच हेलिकॉप्टरने जमिनीवर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. आग्य्राला ‘नो फ्लाय झोन’ (विमान उड्डाणास बंदी) घोषित करण्यात आला आहे. उंच ठिकाणांवर आग्रा पोलिसांचे खास कमांडो तैनात करण्यात आले आहेत. आग्रा शहरातील सगळ््या हॉटेलचालकांना त्यांनी त्यांच्याकडील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्यास व हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांचा सगळा तपशील ठेवण्यास प्रशासनाने सांगितले आहे.ताजला अनेक दिग्गजांची भेटओबामा यांच्या आधीही अनेक देशांच्या अध्यक्षांनी ताजमहलच्या सौंदर्याचा आनंद लुटला आहे. त्यात १९५९ मध्ये ड्वॉईट आयसेनव्हॉवर, २००० मध्ये बिल क्लिंटन, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन, दीमित्री मेदवेदेव, पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क, बेल्जियमची महाराणी पाओला, स्वीडनची राजकन्या व्हिक्टोरिया, पॅलेस्टाईनेचे राष्ट्रपती मोहम्मद अब्बास, फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सार्कोजी बुल्गारियाचे पंतप्रधान सरगेई स्टेनिशेव, चीनचे राष्ट्रपती हू जिंतावो, रोमानियाचे राष्ट्रपती ट्राईएन आणि पाकचे राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी ताजमहलला भेट दिली होती.ओबामा यांचा असा असेल दौरा सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात त्यांचे स्वागत होईल.  त्यानंतर ते राजघाटावर जातील व महात्मा गांधीजींच्या स्मारकावर पुष्पांजली वाहतील.हैदराबाद हाऊस येथे मोदी व अध्यक्ष ओबामा यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. संध्याकाळी ओबामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतील. राष्ट्रपती भवनात रात्री मेजवानीचे आयोजन करण्यात आले.प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ओबामा हजर राहतील. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या अ‍ॅट होम मेजवानीतही ते सहभागी होतील.दुपारी अध्यक्ष ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्यावसायिक चर्चा होईल राष्ट्राध्यक्ष ओबामा यांची काही निवडक लोकांशी चर्चा होईल. ओबामा व मोदी यांची संयुक्तरित्या आकाशवाणीवर मन की बात होईल. ओबामा आग्रा येथे जातील व जगातील सात आश्चर्यातील एक असणाऱ्या ताज महाल पाहतील. डायना बेंचवर ओबामा पतीपत्नी छायाचित्र काढून घेतील कारण ताजमहल बघून डायना बेंचवर बसून छायाचित्र न काढल्यास ही ताजमहल भेट अर्धवट समजली जाते. या बेंचचा ताजच्या इतिहासाशी काहीही संबंध नसला तरी या बेंचचा स्वत:चा असा इतिहास आहे. १९९२ मध्ये ब्रिटनचे राजपूत्र प्रिन्स चार्ल्स पत्नी डायनासोबत येथे आले असताना डायनाने या बेंचवर एकट्याने बसून छायाचित्र काढून घेतले. तेव्हापासून हा बेंच डायना बेंच म्हणून प्रसिद्ध झाला.भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. सय्यद जमाल हसन यांनी सांगितले की हा बेंच ताजमहल किंवा त्याच्या कोणत्याही बागेच्या मूळ स्वरुपाचा भाग नाही. नंतर छायाचित्रे काढण्यासाठी येथे ठेवण्यात आले.आयसेनव्हॉवर यांच्यासोबत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते तेव्हा आजच्यासारखी सुरक्षाव्यवस्था नव्हती. तेव्हा लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते व या दोन्ही नेत्यांच्या अगदी जवळ उभे राहून त्यांना बघता आले. नेहरू तेव्हा स्वागतपर भाषणात म्हणाले होते की,‘‘बडे देश के राष्ट्रपती हैं. हमारे मुल्क आये हैं. अमेरिका हमारी मदद कर रहा हैं. खेती के मामले में पैदावार बढाने लिए. हम और आप उनका स्वागत करते हैं’’कडक सुरक्षा : ओबामा दिल्लीहून हवाई मार्गाने आग्य्राला जातील परंतु दाट धुके, पावसाने काही अडथळा आला तर ते रस्त्यानेही जाऊ शकतात म्हणून दिल्ली ते आग्य्रापर्यंत ताज एक्स्प्रेसवेवर कडक सुरक्षा व्यवस्था असेल. 165 किलोमीटरचा हा सहापदरी रस्ता सामान्य प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद केला जाईल. सुरक्षेसाठी शार्प शुटर्सना मोक्याच्या जागी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय दहशतवादविरोधी पथकाच्या ७५ जवानांची तुकडीही तैनात असेल.हवामान खराब असल्यासजयपूरला विमान उतरणारअमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे विमान २५ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीतील हवामान खराब असल्यास गरजेनुसार जयपूर विमानतळावर उतरविण्याची शक्यता पडताळली जात आहे. यादृष्टीने अमेरिकी सुरक्षा यंत्रणांद्वारे येथील विमानतळाची पाहणी करण्यात आली. अमेरिकी सुरक्षा दलाचे एक पथक सी १७ विमानातून येथे दाखल झाले असून त्यांनी विमानतळ व्यवस्थापन व येथील तैनात वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी तासभर चर्चा केली. जयपूर येथील सांगानेर विमानतळ दिल्लीपासून सर्वात नजीकचे विमानतळ आहे.दौरा फलदायी ठरेल;अमेरिका आशावादीभारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांसाठी सध्या एक ‘अद्भूत’ काळ असल्याचे संबोधत अमेरिकी संरक्षण मंत्री चक हेगेल यांनी ओबामा यांचा हा भारत दौरा ‘ठोस व सराकारात्मक’ राहील, असा विश्वास व्यक्त केला. अमेरिकी संरक्षण मुख्यालय पेंटागॉनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हेगेल म्हणाले, चालू आठवडाअखेरीस सुरु होणारा राष्ट्राध्यक्षांचा दौरा, या विभागाद्वारे करण्यात आलेले, सुरु असलेले वा सातत्याने चालू असलेल्या प्रयत्नांतर्गत अनेक क्षेत्रांत ठोस व सकारात्मक परिणाम दिसून येतील. अमेरिकी अवर संरक्षण सचिव फ्रँक केंडेल सध्या भारतात असून ते आपल्या भारतीय समकक्ष उच्चपदस्थांशी चर्चा करत आहेत. नो फ्लार्इंग झोनगृहमंत्रालयाच्या सूत्रानी माहितीनुसार अमेरिकी राष्ट्राध्यक्ष भारतात आल्यानंतर जमिनीवर तसेच आकाशात सुरक्षेचा अचूक घेरा तयार केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुरक्षा प्रणालीचा तपशील असलेल्या यलो बुकनुसार अमेरिकी अध्यक्षांच्या उड्डाणादरम्यान दुसऱ्या कोणत्याही विमानाला ३०० किलोमीटरपर्यंतच्या टापूत उडण्याची परवानगी दिली जात नाही. यावेळी ही मर्यादा ५०० कि.मी. पर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रतिबंधाचा ढोबळ अंदाज सांगायचा, तर दिल्ली-लाहोर अंतर सुमारे ५०० कि.मी. आहे. या कक्षेच्या आत कोणतेही विमान आल्यास एअरफोर्स वनमधील रिमोटने ते उडविले जाईल. सोनियांच्या नेतृत्वातकाँग्रेसचे शिष्टमंडळप्रजासत्ताक दिनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ जाणार आहे. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी येथे वार्ताहरांना ही माहिती दिली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात राहूल यांच्याऐवजी अन्य कुणाचा समावेश आहे, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. २०१० च्या दौऱ्यातही काँग्रेस अध्यक्षांनी ओबामांशी बातचीत केली होती.