शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

‘ताज’चे मनोरे काळवंडले!

By admin | Published: May 05, 2015 2:07 AM

ताजमहालचे आरस्पानी सौंदर्य आता यमुनातीरावरील मेहताब बागेतून न्याहाळण्याची संधी पर्यटकांना मिळणार असली, तरी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीताजमहालचे आरस्पानी सौंदर्य आता यमुनातीरावरील मेहताब बागेतून न्याहाळण्याची संधी पर्यटकांना मिळणार असली, तरी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने संसदीय समितीच्या धक्कादायक अहवालाकडे साफ दुर्लक्ष करून हा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. ताजमहालचा शुभ्रपणा काळवंडत असल्याचे गंभीर निरीक्षणही या समितीने अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच नोंदवले असतानाच पर्यटनमंत्र्यांनी ही लोकप्रिय घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ताजमहालचे चार मनोरे काळे पडत असल्याने त्यावर शास्त्रीय उपाय शोधा, असे स्पष्ट करून जोवर मनोरे चमकत नाहीत तोपर्यंत पर्यटकांची रात्रसफर करू नये, अशी तंबी १३ खासदारांच्या संसदीय समितीने दिली होती़ मात्र याकडे साफ दुर्लक्ष करून यमुनातीरावरील मेहताब बागेतून पर्यटकांना ताजमहाल पाहण्याची मुभा पर्यटन मंत्रालय देत असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे़ एवढेच नव्हे, तर ताजमहालचे सौंदर्य टिकवण्यासाठी कोणते उपाय असावेत, यावर संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण इंजिनीअरिंग अनुसंधान संस्थेचा (एनईईआरआई) अभ्यास अहवाल आला नाही. या संस्थेने दिलेल्या प्राथमिक अहवालाचेही विश्लेषण अजून पूर्ण झालेले नाही, असे २७ एप्रिल रोजी पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनीच लोकसभेत कबूल केल्यावर तसेच एनईईआरआईच्या अहवालातील अंतिम शिफारशी पाहूनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असे त्यांनीच स्पष्ट केल्यावर प्रत्यक्षात रात्रसफरीची मुभा दिली. चंद्रप्रकाशात पर्यटकांना ताजमहाल न्याहाळता यावा, या मागणीचा पर्यटकांचा रेटा असल्याने ५० पर्यटकांच्या एका गटाला परवानगी दिली होती. त्यावरही एनईईआरआईच्या प्राथमिक अहवालात आक्षेप घेतले आहेत.