नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी जो हिंसाचार झाला, त्यामागे हात असलेल्या व्यक्ती व राजकीय पक्षावर कडक कारवाई करा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
आप या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केजरीवाल म्हणाले, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये जो हिंसाचार घडला तो दुर्दैवी होता. शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटले नसल्याने त्यांचे आंदोलन यापुढेही सुरूच राहणार आहे. आप पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
आंदोलन केंद्र सरकारमुळे चिघळलेदिल्लीतील हिंसाचाराबाबत ‘आप’ने एका निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी आंदोलन चिघळण्यास केंद्र सरकारनेच हातभार लावला आहे. शेतकरी आंदोलन कमजोर करण्यासाठी काही प्रवृत्तींनी हिंसाचार घडविला. नाहीतर, गेले दोन महिने शेतकरी आंदोलन अत्यंत शांततेत सुरू होते.
तो देश कधीही सुखी राहू शकत नाहीज्या देशात शेतकऱ्यांना आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागते, तो देश कधीही सुखी राहू शकत नाही. तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर श्रीमंत उद्योगपती डल्ला मारणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे बाका प्रसंग उभा राहिला आहे.त्यांनी सांगितले की, २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये घडलेल्या हिंसाचारासाठी ज्या व्यक्ती किंवा राजकीय पक्ष जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी.