लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्रातील संघर्षाबाबतचा खटला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाकडे आहे. चंद्रचूड यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. या ट्रोलर्सना राज्यातील सत्ताधाऱ्यांविषयी सहानुभूती असण्याची शक्यता आहे. ही मोहीम चालविणाऱ्या ट्रोलर्स कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सत्तासंघर्षाच्या खटल्याच्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले होते. काँग्रेसचे राज्यसभा खासदार व वकील विवेक तन्खा यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रावर उद्धव ठाकरे गटाच्या खा. प्रियांका चतुर्वेदी, आपचे खा. राघव चढ्ढा, काँग्रेसचे खा. इम्रान प्रतापगढी, समाजवादी पक्षाच्या खा. जया बच्चन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"