नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने देशभरातून ३५०० कोटी रुपयांची ९०० पेक्षा अधिक बेनामी संपत्ती हस्तगत केली आहे. यात फ्लॅट, दुकाने, दागिने आणि वाहने यांचा समावेश आहे. बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई झाली. हा कायदा २०१६ मध्ये अस्तित्वात आला.या कायद्यानुसार बेनामी संपत्ती जप्त करण्याची तरतूद आहे. अशा संपत्तीचा लाभ घेणारे, बेनामी संपत्तीधारक आणि अशा संपत्तीची देवाण-घेवाण करणा-यांविरुद्ध खटला चालविला जाऊ शकतो. दोषींना सात वर्षांची शिक्षा आणि संपत्तीच्या बाजारमूल्याच्या २५ टक्के दंड देण्याची तरतूद आहे. प्राप्तिकर विभागाने मे २०१७ मध्ये २४ खास बेनामी संपत्ती प्रतिबंधक युनिट सुरू केली आहेत.आता ९०० पेक्षा अधिक मालमत्ता हस्तगत करण्यात आल्या आहेत. यात भूखंड, फ्लॅट्स, दुकाने, दागिने, वाहन, बँकेतील ठेवी यांचा समावेश आहे. हस्तगत करण्यात आलेल्या संपत्तीचे मूल्य ३५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यात २९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक अचल संपत्ती आहे.मूळ मालक बेपत्ताकाळा पैसा रोखण्यासाठी १९८८ मध्ये बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा करण्यात आला होता. या कायद्यात २०१६ मध्ये दुरुस्ती करण्यात आली.- हस्तगत करण्यात आलेल्या संपत्तीचेमूळ मालक समोर आलेले नाहीत.एका प्रकरणात वाहनातून १.११कोटी रुपयांची रक्कम जप्त केली.- या रकमेवर दावा करण्यासाठीकोणीही पुढे आले नाही. अशी संपत्ती बेनामी म्हणून नोंद केली जाते.नोटाबंदीत दोन लाखांवर जमा करणा-यांना नोटिसा- नोटाबंदीच्या काळात ५०० व १००० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बँकेत जमा करणाºयांना प्राप्तिकर विभागाने नोटिसा पाठवणे सुरू केले आहे. त्यांना नगदी रकमेचे स्रोत सांगण्याच्या सूचना दिल्या आहेत.- पहिल्या टप्प्यात २ लाखांहून अधिक रक्कम बँकांत जमा करणाºयांचा समावेश आहे. मार्चपर्यंत अशा सर्व खातेधारकांना प्राप्तिकर विभाग नोटिसा पाठवणार आहे.
३५०० कोटींच्या बेनामी संपत्तीवर आणली टाच, प्राप्तिकर विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 6:17 AM