ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 6 - कर परतावा भरताना नावातील पहिल्या अक्षरामुळे अडचण निर्माण होईल, याची के. व्यंकटेश यांनी कल्पनाच केली नव्हती. त्यांच्या नावातील "के" या अक्षरामुळे कर परतावा भरताना समस्या निर्माण झाल्या आहेत, कारण त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जुळत नाही. बँकेत काम करणा-या के. व्यंकटेश यांनी आपल्या अकाऊन्टंटला संपर्क साधल्यानंतर त्यांचा हा प्रकार लक्षात आला.
व्यंकटेश यांच्या नावातील "के" हे अक्षर म्हणजे कृष्णास्वामी असे असून हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे आणि हे नाव आधार डेटाबेसमध्ये आहे. मात्र, हे नाव जुळवण्यास प्रणाली नकार देत आहे. आगामी काळात देशभरातील लाखो लोकांना या अडचणीला सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण 31 जुलैपर्यंत पॅन कार्ड -आधार कार्डाशी जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यामुळे, छोटी-मोठ्या चुकादेखील स्वतःहून दुरुस्त केल्या जाऊ शकत नसल्याने, चार्टर्ड अकाऊंटंटसची मदत घेण्यासाठी आता गर्दी होऊ लागली आहे.
पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्यात येणा-या समस्या
- आधार कार्ड विशेष वर्ण किंवा अक्षरांची ओळख करू शकत नाही
- आधार नावातील सुरुवातीच्या अक्षराचीही पडताळणी करू शकत नाही, मात्र पॅन कार्ड सहजरित्या अक्षरं ओळखू शकतो
- दक्षिणेकडील लोकांना या समस्येचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागू शकतो. कारण ते आपल्या नावापूर्वी गाव तसेच वडिलांचे नाव जोडतात. (उदाहरणार्थ - के. एल. श्रीनिवास यांचे पूर्ण नाव कलाकुरूची सुब्रमण्यन श्रीनिवास असे आहे.)
- मधले किंवा शेवटचे नाव इत्यादी माहिती जोडताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड जुळत नाही.
लग्नानंतर नावात बदल झाल्यामुळे काही महिलांसमोर ही अडचण निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ महिलेचं लग्नाआधीचं नाव कविता श्रीकांत बापट असे आहे. लग्नानंतर तिने नाव कविता बापट-शिर्के जोडल्यास प्रणाली हे नाव चुकीचे ठरवेल.
समस्येवरील उपाय
-छोट्या-मोठ्या समस्यांसाठी आधार संचालनचे काम पाहणारी एजन्सी यूआयडीएआयला या प्रकरणात आधार-पॅन डेटाबेस लिंक केले पाहिजे, असे सुरक्षा विशेषज्ज्ञ आणि सीए यांना वाटते.
-नावाच्या उच्चारणातील समस्या, ही बाब केवायसीसाठी बँक ई-ड्युप्लिकेशन शिवाय बँकेतील कर्मचारीही याची पडताळणी करतात.
-आणि ज्याठिकाणी दोन्ही गोष्टींची जोडणी करणं अशक्य आहे. तेथे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यातील एक कार्ड रद्द करुन पुन्हा नवीन कार्ड बनवण्याचा पर्याय आहे. जेणेकरुन दोन्ही कार्डवरील माहिती योग्य पद्धतीत जुळून येईल.