कोलकाता : ५०० आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी मोदी सरकारवर नव्याने हल्ला चढविला. हा काळा राजकीय निर्णय सामान्य लोकांच्या विरुद्ध असल्यामुळे तो त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. क्रयशक्ती ढासळत आहे. देशभरातील बाजारपेठा देशोधडीला लागल्या असून, लोक त्रस्त आहेत. त्यामुळे हा काळा राजकीय निर्णय मागे घ्यावा, असे ट्विट ममता यांनी केले आहे. आपण हे यापूर्वी म्हटले होते. तथापि, युवा, बुजुर्ग आणि सामान्यांची फरपट पाहवत नसल्यामुळे आपण पुन्हा एकदा ही मागणी करीत आहोत, असे बॅनर्जी म्हणाल्या. हा एक मोठा घोटाळा आहे. सामान्य नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असून, पैशांचे हवाला व्यवहार करणाऱ्यांची चांदी झाली आहे, असे त्या म्हणाल्या.
काळा राजकीय निर्णय मागे घ्या - ममता
By admin | Published: November 13, 2016 3:29 AM