नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी बॉलिवूडमधील आघाडीच्या निर्मात्यांना पत्र लिहून कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक विरोधी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.मनेका गांधी यांनी आपल्या पत्रामध्ये लैंगिक शोषणाची व्याख्याही दिली आहे. लैंगिक सुखाची मागणी करणे, अश्लिल शेरेबाजी वा शारीरिक लगट, करणे, अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे, पोर्न फिल्म्स वा चित्रे दाखवणे, या प्रकारच्या वर्तनाचा लैंगिक शोषणात समावेश होतो, याचा उल्लेख करून त्यांनी लिहिले आहे की, सर्व निर्मात्यांनी असे प्रकार रोखण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या निर्मिती संस्थेतील वा बाहेरील व्यक्तीचे लैंगिक शोषण झाल्यास त्यास निर्मिती संस्थेचा प्रमुखच जबाबदार असेल. त्यामुळे दक्षता घेण्यात यावी.
लैंगिक शोषण थांबविण्यासाठी पुढाकार घ्या - मनेका गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:34 AM