नवी दिल्ली : आयकर विभागाने आयकर भरण्यासाठी महिन्याची मुदतवाढ दिली आहे. मात्र, तरीही आयकर भरण्यासाठी चालढकल करणाऱ्यांसाठी महत्वाचा इशारा आहे. कारण 31 ऑगस्टची वाट पाहिल्यास विभागाच्या वेबसाईटवर करदात्यांचा दबाव वाढल्याने वेबसाईट स्लो किंवा क्रॅश होण्याचा धोका आहे. यामुळे जर का आयकर भरला गेला नाही, तर मोठा दंड भरावा लागणार आहे.
आयकर विभाग गेल्या काही वर्षांपासून आयकर भरण्याची मुदत 31 जुलैवरून 31 ऑगस्टवर वाढवत असतो. याचा उद्देश असा की आयकर दात्यांची संख्या वाढावी. मात्र, अनेकदा याचे गांभीर्य नसल्याने करदाते आयकर भरण्यास टाळाटाळ करतात. अशा लोकांनाही मुदत उलटून गेल्यावर कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, यासाठी दंड भरावा लागतो. बऱ्याचदा केवळ तुमचे उत्पन्न दाखवावे लागते, मात्र, कर भरावा लागत नाही. तरीही उशिर केल्यास 10 हजारांचा दंड हकनाक भरावा लागतो.
सध्याच्या आयकर विभागाच्या नियमांनुसार जो करदाता मुदतीनंतर रिटर्न फाईल करतो त्याला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. छोट्या करदात्यांना या बाबत थोडा दिलासा देण्यात आला आहे. ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना 1 हजार रुपयांचा दंड आकारला जातो. तर यापैकी जे करदाते 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करतात त्यांना 5 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. तर त्यानंतर भरणाऱ्यांना दुप्पट म्हणजेच 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
आयकर विभागाने गेल्या महिन्यात आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून वाढवत 31 ऑगस्ट केली होती.
नोकरदार वर्गासाठी दहा बदल:१) १0 प्रमुख बदलांपैकी पहिला बदल हा पगारासंबंधी दिल्या जाणाऱ्या माहितीबद्दल आहे. आता नोकरदार वर्गाला पगारासंबंधी असलेल्या भत्त्यांची व सूटची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच करदात्याला फॉर्म १६ आणि आयटीआर फॉर्म या कोणत्याही परिस्थितीत साम्य असण्याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे.भाडेतत्त्वावरील उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी :२) आता करदात्याला भाड्याकरिता टॅन देणे आवश्यक आहे. जर त्याचा टीडीएस हा १९४ अंतर्गत झाला असेल व पॅन जर त्या व्यक्तीचा टीडीएस हा एखाद्या Individual किंवा HUF द्वारे १९४ IB अंतर्गत कापला गेला आहे.कॅपिटल गेनअंतर्गत असलेल्या उत्पन्नासाठी :३) कलम ११२ ए च्या तरतुदीनुसार, समभाग किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड जे ग्रँडफादरिंग क्लॉजप्रमाणे ज्यातून कॅपिटल गेन झाला आहे. त्यासंबंधी असलेले ठअश्चे मोजमाप हे ३१ जानेवारी २0१८ रोजीचे देणे आवश्यक आहे.४) करदात्याला आता २ीू ११२अ नुसार पर्याय आहे की समभागानुसार करकठ कोडची माहिती देणे किंवा एकूण कॅपिटल गेनची माहिती देणे हा पर्याय कळफ २, ३,५,६ भरणाºया करदात्यांना उपलब्ध आहे.
व्यवसायातून असलेल्या नफा व उत्पन्नासंबंधी :५) ज्या करदात्यांना संबंधित आर्थिक वर्षासाठी नफा व तोटा खाते व ताळेबंद देणे आवश्यक आहे त्या करदात्यांना उत्पादन व व्यापार खात्यांसंबंधी माहिती देणेसुद्धा बंधनकारक आहे.दुसरे विविध बदल :६) जर शेतीविषयक उत्पन्न हे ५ लाखांवर असेल तर शेतीसंबंधी असलेल्या जागेची माहिती (एकरमध्ये) त्याचे मालकीतत्त्व, जिल्हा, पिनकोड इ. आयटीआरमध्ये देणे गरजेचे आहे.७) करदात्याला २६ एएसप्रमाणे भरलेल्या टीडीएससंबंधी के्रडिटसाठी कोणत्या वर्गाअंतर्गत उत्पन्न नमूद केले आहे ते देणे गरजेचे आहे.८) करदात्याला आपल्या रहिवासी स्थितीसंबंधी सखोल माहिती देणे आवश्यक आहे.९) कंपनीत असलेल्या डायरेक्टरशिपसंबंधीमाहिती देताना त्याचे नाव, कंपनीचे पॅनकार्ड आणि डायरेक्टरचा डीआयएन नं. आयटीआरमध्ये देणे गरजेचे आहे.१0) वापर न केल्या गेलेल्या समभागासंबंधी माहिती देणे करदात्याला आवश्यक आहे.