DK Shivakumar : "आता 10-12 टक्के कमिशन घेतात डीके शिवकुमार", काँग्रेस नेत्यांचा आरोप केल्याचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 06:49 PM2021-10-13T18:49:19+5:302021-10-13T18:52:57+5:30
DK Shivakumar : व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाचे नेते व्ही एस उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बंगळुरू : कर्नाटकमध्येकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधारी पक्ष भाजपानेही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे दोन नेते शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाचे नेते व्ही एस उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर, पक्षाचे नेते सलीम अहमद यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. (Karnataka: Congress expels media coordinator for accusing Shivakumar of corruption in viral video)
व्हिडिओमध्ये काय आहे?
या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे माजी लोकसभा खासदार व्ही एस उग्रप्पा आणि कर्नाटक काँग्रेसचे मीडिया समन्वयक सलीम गुप्तपणे बोलताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, मीडिया समन्वयक सलीम म्हणतात की, शिवकुमार 10-12 टक्के लाच घेतात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याद्वारे शेकडो कोटींची संपत्ती गोळा केली आहे.
Video proof for DK Shivkumar loot exposed by Salim Ahmed working president of KPCC pic.twitter.com/UxF3yOcBUQ
— Prakash.S 🇮🇳 (@sprakaashbjp) October 13, 2021
सलीम यांनी आरोप केला की, शिवकुमार आधी 6 ते 8 टक्के कमिशन घेत होते, पण आता ते वाढवून 10-20 टक्के केले आहे. ते म्हणाले की, हा एक मोठा घोटाळा आहे आणि तुम्ही जितके जास्त खोदला तर जास्त बाहेर पडेल. शिवकुमार यांचा सहयोगी मुलगुंडने 50 ते 100 कोटी कमावले आहेत, असा आरोपही सलीम यांनी केला आहे.
शिवकुमार यांच्यावर दारू पिण्याचा आरोप
व्हिडिओमध्ये सलीम यांनी शिवकुमार यांच्यावर दारू प्यायल्याचा आरोप करतानाही ऐकू येत आहे. शिवकुमार हे अनेकदा बोलताना अडखळतात. पण, मला माहीत नाही की, हे कमी रक्तदाबामुळे किंवा दारूमुळे. आम्ही लोकांनी अनेक वेळा चर्चाही केली आहे, असे सलीम यांनी म्हटले आहे.