मानवी हक्क : मद्रास हायकोर्टाचा आदेश
चेन्नई : गृहपाठ करून न आणण्याची शिक्षा म्हणून विद्याथ्र्याचा, इजा होईल एवढय़ा जोरात, गालगुच्च घेणा:या एका शिक्षिकेस मद्रास उच्च न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मैलापूर येथील केसरी उच्च माध्यमिक विद्यालयातील रमा गौरी असे या शिक्षिकेचे नाव आहे. सातव्या इयत्तेत शिकणा:या या विद्याथ्र्याच्या आईने दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्द करावी यासाठी रमा गौरी यांनी केलेली याचिका फेटाळताना मुख्य न्यायाधीश न्या. संजय कृष्ण कौल व न्या. एम. सत्यनारायणन याच्या खंडपीठाने हा दंड ठोठावला.
घटनेनंतर त्या विद्याथ्र्याची आई मेहरुन्नीसा यांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध फौजदारी फिर्याद दाखल करण्याखेरीज हे प्रकरण राज्य मानवाधिकार आयोगाकडेही नेले होते. आयोगापुढे शिक्षिका रमा गौरी यांनी असा बचाव केला की, त्यांनी त्या विद्याथ्र्याचा गालगुच्च घेतला नव्हता. गृहपाठ करून आणला नाही म्हणून वर्गात उभे करून आपण फक्त त्याचा कान पिरगळला होता. मात्र आपण कान पिरगळलेला असताना तो विद्यार्थी दूर पळू लागल्याने त्याचा कान खेचला गेला व त्यामुळे गालाला सूज आली होती.
मानवाधिकार आयोगाने हा बचाव अमान्य केला व अशा प्रकारे शिक्षा करणो हा विद्याथ्र्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा निकाल देत शाळेला 1 हजार रुपये दंड ठोठावला होता. हा दंड खूपच कमी आहे. शिवाय शाळेने माङया मुलाचा दाखला देण्यास मुद्दाम विलंब लावला, अशी तक्रार करीत मेहरुन्नीसा यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. हे अपील व शिक्षिका रमा गौरी यांना फिर्याद रद्द करण्यासाठीचा अर्ज या दोन्हींवर एकत्रित सुनावणी करून खंडपीठाने वरीलप्रमाणो 5क् हजार रुपयांचा दंड ठोठावत शिक्षिकेने आपले म्हणणो दंडाधिका:यांपुढे मांडावे, असे सांगितले. (वृत्तसंस्था)
काय घडले होते?
शिक्षिका रमा गौरी यांनी वर्ष 2क्12मध्ये गृहपाठ करून आणला नाही म्हणून इयत्ता सातवीत शिकणा:या विद्याथ्र्यास वर्गात शिक्षा करताना त्याचा एवढय़ा जोरात गालगुच्च घेतला होता की करकचून घेतलेल्या चिमटय़ाने त्या विद्याथ्र्याचा गाल रक्त साकोळून सुजला होता.