कारवाई ऐवजी विकासावर बोला विलास पाटील: पत्र परिषदेत आव्हान
By admin | Published: March 29, 2016 12:25 AM
जळगाव : वर्मावर बोट ठेवले म्हणून खडसे नाराज झाले. त्यांनी प्रत्येकावर कारवाईची भाषा करण्या ऐवजी विकासावर बोलावे. राष्ट्रवादीकडून नेत्यांबद्दलच्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जळगाव : वर्मावर बोट ठेवले म्हणून खडसे नाराज झाले. त्यांनी प्रत्येकावर कारवाईची भाषा करण्या ऐवजी विकासावर बोलावे. राष्ट्रवादीकडून नेत्यांबद्दलच्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवारांवर गुन्हे दाखल करा व जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यावर पंधरा दिवसात गुन्हा दाखल होईल असे वक्तव्य केले. या संदर्भात पक्षाची भूमिका विषद करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद आयोजिली होती. खडसेंच्या या भूमिकेचा यावेळी निषेध करण्यात आला. डॉ. सतीश पाटील यांची कुंडली माहिती आहे तर मग पंधरा दिवस वाट का पहाता असे सांगून पाटील म्हणाले, त्यांचीही कुंडली कोणी न कोणी भविष्यात काढेलच. वर्मावर बोट ठेवले म्हणून ते अशी भाषा करत आहेत. आपल्या राजकीय जीवनात खडसे यांनी काय केले ते सांगावे. आता तर ते ११ खात्याचे मंत्री आहेत. मात्र तरीही जिल्ासाठी काहीही केलेले नाही. सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी पालकमंत्र्याची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. पवारांशी तुलना करू नकाआमचे नेते शरद पवार यांच्याशी ते तुलना करतात. राजकारणात त्यांचे योगदान मोठे आहे. तसेच तुमचे काय? शेती व्यवसात ते दाखवतात. सर्वांना शेतीत नुकसान होते आहे मग खडसेंनाच फायदा कसा त्यांच्या शेती तंत्रज्ञानाचा मंत्र अन्य शेतकर्यांना दिल्यास त्यांचाही फायदा होईल असा टोलाही त्यांनी मारला. केवळ धमक्या न देता विकासावर बोलावे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशा धमक्या सहन करणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला. युवक अध्यक्ष योगेश देसले, महिला महानगर अध्यक्षा मिनल पाटील, माधुरी पाटील, युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, कल्पना पाटील, गणेश नन्नवरे, रोहन सोनवणे आदी उपस्थित होते.