लखनौ : आपल्या कार्यकाळात अयोध्येत राम मंदिर उभे राहील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी द्यावे. त्यांनी ते जाहीरपणे दिले तरच उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत संत-मंहत भाजपला पाठिंबा देतील, असे रामलला मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे. अयोध्येत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे ते काम पाहतात.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मंदिर उभे राहील, अशी आम्हाला आशा होती. आता निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मोदींनी अयोध्येला भेट देऊन आम्हाला राम मंदिर बांधून देण्याची हमी द्यावी तसेच आपल्याच कार्यकाळात राममंदिर उभे राहील, असे घोषित करावे, असे सत्येंद्र दास यांनी म्हटले. मोदींनी मंदिर उभारणीची घोषणा केली, तरच आम्ही हिंदूंना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करू. उत्तर प्रदेशात संत-महंतांच्या अनुयायांची मोठी संख्या आहे. जर आम्ही पाठिंबा दिला, तर भाजप निश्चितपणे जिंकेल, असेही ते म्हणाले. सत्येंद्र दास यांच्या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अयोध्येतील रसिक निवास मंदिराचे महंत रघुवर शरण यांनी भाजपवर टीका केली. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्याने भाजपला सत्तेवर बसविले; परंतु भाजपने हा मुद्दा कधीही संसदेत उपस्थित केला नाही, असा आरोप शरण यांनी केला. (वृत्तसंस्था)नेते मोठे झाले, पण आवाज उठवला नाहीअयोध्यत राम मंदिर उभारण्याच्या मुद्द्यावर राजकारणात मोठे झालेले आणि मोठी पदे मिळविलेले लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार आणि उमा भारती आदी भाजप नेते आजही संसद सदस्य आहेत. तथापि, त्यांनी राम मंदिरासाठी कधीही संसदेत आवाज उठविला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा ठराव संसदेत मांडावा, अशी मागणीही केली नाही, असे ते म्हणाले.
राम मंदिराचे आधी बोला
By admin | Published: January 15, 2017 12:55 AM