नवी दिल्ली : फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोईस ओलांद रविवारी भारतभेटीवर येत असून ते दहशतवाद, वातावरण बदल आणि स्मार्ट सिटीसारख्या मुद्यांवर चर्चा करतील, असे या देशाचे राजदूत फ्रान्कोईस रिचियर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.ओलांद यांच्या भारतभेटीच्या निषेधार्थ धमकी देणारे पत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशा भीतीची शक्यता फेटाळून लावली. फ्रान्सच्या शिष्टमंडळावर होणारा कोणताही संभाव्य हल्ला टाळण्यासाठी दिल्लीतील सुरक्षा दल फ्रान्सच्या अधिकाऱ्यांसोबत एकजुटीने काम करीत आहे. धमकी देणाऱ्या पत्राची माहिती बाहेर येणे ही दु:खाची बाब आहे, असेही ते म्हणाले. ओलांद हे चर्चेत उपरोक्त तीन मुद्यांवर लक्ष केंद्रित करतील. फ्रान्समध्ये अलीकडेच झालेल्या हल्ल्यानंतरची आणीबाणी, सिरिया, इराक व आफ्रिकेतील लष्करी मोहिमा तसेच भारतातील स्थिती पाहता दहशतवाद हा मुख्य मुद्दा ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)
दहशतवादावर ओलांद करणार चर्चा
By admin | Published: January 23, 2016 3:29 AM