कर्नाटक सरकारमध्ये बदलाची चर्चा, तीन उपमुख्यमंत्री होणार? काँग्रेस हायकमांड घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 05:59 PM2023-09-17T17:59:03+5:302023-09-17T18:00:07+5:30
कर्नाटक सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता.
गेल्या काही महिन्यापूर्वी कर्नाटकातकाँग्रेस मोठ्या विजयाने सत्तेत आली. आता मंत्रिपदावरुन गोंधळ सुरु असल्याचे बोलले जात आहे. आता राज्यात तीन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आतापर्यंत फक्त वोकलिंगा समाजातील डीके शिवकुमार यांनाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते, मात्र आता आणखी दोन जणांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची चर्चा सुरू आहे.
राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारचे मंत्री केएन रज्जना यांनी२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तीन उपमुख्यमंत्री असावेत, असे म्हटले होते. हे त्यांचे वैयक्तिक मत असून अंतिम निर्णय हायकमांडने घ्यावा, असे त्यांनी निश्चितपणे सांगितले होते. मात्र, यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अद्याप काहीही बोलणे योग्य मानले नाही. हा निर्णय त्यांचा नाही, हे सर्व हायकमांडला पहावे लागेल, असे त्यांच्या बाजूने ठामपणे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, यापूर्वी त्यांना फक्त एक उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. अशा परिस्थितीत सध्या उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. आता आणखी दोन उपमुख्यमंत्र्यांची गरज भासल्यास हा निर्णय हायकमांडलाच घ्यावा लागणार आहे. काँग्रेस व्होकलिंगा तसेच लिंगायत आणि वीरशैव जातीतून डेप्युटी सीएम बनवू शकते असे सांगितले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणे सोडवण्यावर भर दिला जात आहे.