सुभाष चौकातील हॉकर्सची आयुक्तांशी चर्चा
By admin | Published: March 29, 2016 12:24 AM
सुभाष चौकातील हॉकर्सने सुरुवातीला गोलाणीतील ओटेच रिक्त नसल्याने स्थलांतराला विरोध दर्शविला होता. त्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नगरसेवक अनंत जोशी, उपायुक्त प्रदीप जगताप तसेच हॉकर्स संघटनेचे प्रतिनिधी बाळू बाविस्कर, मोहन तिवारी आदी उपस्थित होते. सुभाष चौकात ३३२ हॉकर्स आहेत. मात्र मनपाच्या दप्तरी नोंदणी केलेले २०६ हॉकर्स आहेत. त्यावर आयुक्तांनी अनेक हॉकर्सनी ४-४ जागा अडविल्या आहेत. एका परिवारात एकच जागा दिली जाईल. जर हे सर्व हॉकर्स खरे असल्याचे सिद्ध झाले तर सर्वांना जागा देऊ. त्यामुळे स्वत:हून ही नावे कमी करून घ्यावी, असे आवाहन केले. तसेच अनेकांनी आपल्या जागा अन्य हॉकर्सला भाड्याने दिल्या आहेत. त्यात भाडेकरू हॉकर्सला पर्यायी जागा दिली जाईल, असे स्पष्ट केल्
सुभाष चौकातील हॉकर्सने सुरुवातीला गोलाणीतील ओटेच रिक्त नसल्याने स्थलांतराला विरोध दर्शविला होता. त्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नगरसेवक अनंत जोशी, उपायुक्त प्रदीप जगताप तसेच हॉकर्स संघटनेचे प्रतिनिधी बाळू बाविस्कर, मोहन तिवारी आदी उपस्थित होते. सुभाष चौकात ३३२ हॉकर्स आहेत. मात्र मनपाच्या दप्तरी नोंदणी केलेले २०६ हॉकर्स आहेत. त्यावर आयुक्तांनी अनेक हॉकर्सनी ४-४ जागा अडविल्या आहेत. एका परिवारात एकच जागा दिली जाईल. जर हे सर्व हॉकर्स खरे असल्याचे सिद्ध झाले तर सर्वांना जागा देऊ. त्यामुळे स्वत:हून ही नावे कमी करून घ्यावी, असे आवाहन केले. तसेच अनेकांनी आपल्या जागा अन्य हॉकर्सला भाड्याने दिल्या आहेत. त्यात भाडेकरू हॉकर्सला पर्यायी जागा दिली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी हॉकर्स प्रतिनिधींनी हॉकर्समध्येच बी.जे. मार्केटच्या जागेत यावे की गोलाणी मार्केटच्या बाबत एकमत नसल्याने त्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली. त्यानुसार चौबे मार्केटमध्ये तातडीने हॉकर्सची बैठक घेण्यात आली. सर्व हॉकर्सचे स्थलांतर एकाच ठिकाणी करावे. तसेच पर्यायी जागेवर मनपा प्रशासनाने लकी ड्रॉ द्वारे जागा द्याव्यात, अशी मागणी हॉकर्स प्रतिनिधींनी केली. यादीची तपासणीमनपाचे कर्मचारी व हॉकर्सचे प्रतिनिधी एकत्रितपणे बसून हॉकर्सची यादी घेऊन तिची तपासणी करतील. त्यातील अनधिकृत हॉकर्स कमी केले जातील, असे ठरले.