शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

भाजपविरोधी पक्षांची ऐक्यासाठी चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू-राहुल गांधी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 7:02 AM

लोकसभेच्या २७२ जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्या पक्षाला अन्य लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस व मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत.

- हरिश गुप्ता/संतोष ठाकूरनवी दिल्ली - लोकसभेच्या २७२ जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्या पक्षाला अन्य लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस व मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत. तेलगू देसमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याला रवाना झाले.राजकीय निरीक्षक व सट्टा बाजाराने भाजपला २७२ हा जादुई आकडा गाठता येणार नाही, असे मत वर्तविले आहे. दुसरीकडे प्रसंगी अन्य पक्षांचा पाठिेंबा आम्ही मिळवू शकतो, असे भाजपचे सरचिटणीस राम मोहन व खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधक सावध झाले आहेत.राहुल गांधी व चंद्राबाबू यांच्यात काय चर्चा झाली, ते समजू शकले नाही. मात्र, सत्ताधारी रालोआमध्ये नसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी २३ मे रोजी सरकार स्थापनेसाठी एकत्र यावे, असा चंद्राबाबू यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने, त्या पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थिर सरकारसाठी प्रयत्न सुरू करावेत, अशी त्यांची इच्छा आहे.काँग्रेसने समाजवादी पक्षाशीही चर्चा सुरू केल्याचे समजते. प्रियांका गांधी यांनी सपचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची भेट घेऊ न त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, पण निवडणुकांनंतर सपने काँग्रेससोबत यावे, असे प्रियांका यांचे प्रयत्न आहेत. सप व काँग्रेस यापूर्वी एकत्र आले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र येण्यात अडचण येणार नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.उत्तर प्रदेशात सप व बसप तसेच राष्ट्रीय लोक दल यांची आघाडी असून, त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत. बसपच्या नेत्या मायावती काँग्रेससोबत उघडपणे येतील का, याविषयी शंका असली तरी सप व राष्ट्रीय लोक दल यांचा काँग्रेसला पाठिंबा मिळू शकेल, असे सांगण्यात येते.याशिवाय काँग्रेसचे नेते सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी पटनायक यांच्याशी चर्चा केल्याचे कळते. ओडिशामध्ये भाजपचे प्रस्थ वाढू देण्यापेक्षा काँग्रेसला पाठिंबा देणे बिजू जनता दलाला सोयीचे आहे. भाजपही त्यांच्या संपर्कात आहेत. चक्रीवादळानंतर तिथे पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी उघडपणे पटनायक यांचे कौतुक केले होते. तसेच ओडिशात मदत व पुनर्वसन कार्यासाठी एक हजार कोटीही त्यांनी जाहीर केले. पटनायक यांना खुश ठेवण्यासाठीच हे केल्याचे समजते.रेड्डी, रावनाही सोबत घ्यामतदान आटोपताच काँग्रेसने वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चंद्राबाबूंचे म्हणणे आहे. टीआरएसचे प्रमुख राव बिगरभाजप व बिगरकाँग्रेस प्रादेशिक पक्षांची आघाडीच्या प्रयत्नात आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूRahul Gandhiराहुल गांधी