शहरं
Join us  
Trending Stories
1
"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत 
2
मुंबई मनपा हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, यंत्रणांना सुसज्ज राहण्याचेही निर्देश
3
पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश
4
नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय
5
पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय
6
जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा
7
Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!
8
'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार...
9
कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी
10
महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर 
11
वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
12
"IPLच्या वेळी Hardik Pandya म्हणाला होता- लोकं शिव्या देतायत पण..."; Ishan Kishan ने सांगितली आठवण
13
मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा...
14
मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...
15
अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे बर्बाद झालं या अभिनेत्रींचं करिअर, कोणी देश सोडला, तर कुणी भोगला तुरूंगवास
16
Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
17
अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!
18
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू
19
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; कर्णधार टेम्बा बवुमाची एन्ट्री
20
नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

सीबीआयच्या ताब्यातील 103 किलाे साेने गहाळ; उच्च न्यायालयाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 5:01 AM

एखाद्या प्रकरणी सीबीआय आराेपीच्या पिंजऱ्यात असून, सीबीआयचीच स्थानिक पाेलिसांकडून चाैकशी हाेण्याचे हे दुर्मीळ प्रकरण आहे. 

चेन्नई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केलेले ४५ काेटी रुपये किमतीचे तब्बल १०३ किलाे साेने गहाळ झाले आहे. या प्रकरणी सीबीआयवर न्यायालयाने ताशेरे ओढले असून, चाैकशी करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. एखाद्या प्रकरणी सीबीआय आराेपीच्या पिंजऱ्यात असून, सीबीआयचीच स्थानिक पाेलिसांकडून चाैकशी हाेण्याचे हे दुर्मीळ प्रकरण आहे. सीबीआयने २०१२ मध्ये सुराणा कॉर्पाेरेशन लिमिटेडवर धाडी टाकून ४०० किलाे साेने जप्त केले हाेते. त्यापैकी १०३ किलाे साेने गहाळ असल्याचे उघडकीस आले आहे. सुराणा समूहाच्या ७२ लाॅकर्समध्ये जप्त केलेले साेने सीबीआयच्या ताब्यात ठेवण्यात आले हाेते. या लाॅकर्सच्या चाव्या चेन्नईच्या प्रिन्सिपल विशेष न्यायालयाकडे साेपविल्याचे सीबीआयने म्हटले आहे. जप्त केलेल्या साेन्याच्या विटा आणि दागिने एकत्रितपणे माेजले हाेते, परंतु लिक्विडेटरकडे हस्तांतरित केले, त्या वेळी साेने स्वतंत्रपणे माेजण्यात आले. त्यामुळे वजनामध्ये तफावत आली आहे. (वृत्तसंस्था)चौकशीसाठी सहा महिन्यांची मुदतमद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे तामिळनाडू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविले आहे. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने ही चौकशी करावी, असे सांगत, उच्च न्यायालयाने सहा महिन्यांची मुदत दिली आहे. दरम्यान, सीबीआयही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करणार आहे. सीबीआयला सुनावलेप्रकरणाची चौकशी स्थानिक पोलिसांकडे दिल्यास आमची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, असा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयात केला. परंतु त्यावर न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढले. सर्व पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा. सीबीआयला विशेष शिंगे आहेत आणि स्थानिक पोलिसांना केवळ शेपटी आहे, असे मानायचे का, असे बोल न्यायालयाने सुनावले.ही तर अग्निपरीक्षासीबीआयची ही अग्निपरीक्षा आहे. मात्र, त्यात आम्ही काही करू शकत नाही. सीतेप्रमाणे तुम्ही पवित्र असाल तर या अग्निपरीक्षेतून सुखरूप बाहेर पडाल, अन्यथा पुढील परिणामांना तोंड द्यावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या एकूण प्रकरणी सीबीआयने दिलेल्या उत्तरावर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले असून, ताशेरे ओढले आहेत. 

टॅग्स :Goldसोनं