चेन्नई : तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारने राज्यातील मंदिरातील २ हजार किलाेंहून अधिक साेने वितळविण्याचा निर्णय घेतला आहे. हे साेने वापरण्यात येत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे.
या निर्णयाचा हिंदूंनी विराेध केला आहे. मंदिरातील साेने वितळविल्यानंतर त्याचे २४ कॅरेट बिस्किटांमध्ये रुपांतर करण्यात येईल. हे साेने राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा करण्यात येणार असून त्यातून मिळालेला पैसा मंदिरांच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
राज्याच्या हिंदू चॅरिटेबल ॲण्ड रिलिजिअस एन्डाेवमेंट्स विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १३ ऑक्टाेबरला या याेजनेचे उद्घाटन केले हाेते.
या मंदिरांचा समावेशमदुराई येथील प्राचीन मीनाक्षी मंदिर, पलानी येथील धंदयुथपनी मंदिर, तिरुचेंदूर येथील श्री सुब्रमण्य स्वामी मंदिर यासह ९ माेठ्या मंदिरातील साेने वितळविण्यात येणार आहे.
११ काेटी व्याजआतापर्यंत ५०० किलाे साेने वितळविण्यात आले असून त्यावर सरकारला व्याजापाेटी केवळ ११ काेटी रुपये मिळाले आहेत. यावरुन सरकारवर टीकाही हाेत आहे.