चेन्नई - जुना मित्र असलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीची नव्याने बांधणी झाल्यानंतर आता भाजपासाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली आहे. तामिळनाडूमध्येभाजपा आणि सत्ताधारी एआयएडीएमके पक्षांमध्ये आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. तसेच तामिळनाडू विधानसभेच्या 21 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपा एआयएडीएमकेला पाठिंबा देणार आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल एआयडीएमकेसोबत आघाडीची चर्चा करण्यासाठी तामिळनाडूमध्ये गेले होते. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
अम्मांच्या राज्यात भाजपाला मिळाला तगडा साथीदार, आता उघडणार का दक्षिणेचं दार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 5:25 PM
जुना मित्र असलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीची नव्याने बांधणी झाल्यानंतर आता भाजपासाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली आहे.
ठळक मुद्देजुना मित्र असलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीची नव्याने बांधणी झाल्यानंतर आता भाजपासाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली तामिळनाडूमध्ये भाजपा आणि सत्ताधारी एआयएडीएमके पक्षांमध्ये आघाडी झाली