शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

अवयवदान केल्यास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 5:32 PM

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : तामिळनाडूचेमुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक मोठी घोषणा केली असून राज्यातील अवयवदानाला प्राधान्य मिळावे यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खरं तर अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी घोषणा त्यांनी केली. इतरांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने कोणीही आपले अवयव दान करेल, त्याचे योगदान त्याग मानले जाईल, असे त्यांनी नमूद केले. तामिळनाडू सरकारचा हा निर्णय राज्यात अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आला आहे.

दरम्यान, २००८पासून दरवर्षी तामिळनाडूमध्ये २३ सप्टेंबर रोजी 'अवयवदान दिन' साजरा केला जातो. याच प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ही मोठी घोषणा केली. राज्य सरकार राज्यातील अवयवदान करणाऱ्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करेल, अवयवदान करून एखाद्याचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तींना हा राज्य सन्मान देण्यात येणार असल्याचे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऑर्गन ट्रांसप्लांट युनिटची संख्या तेरा आहे. यासोबतच इतर सत्तावीस वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही यासंदर्भात सुविधा विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी देखील याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. तसेच हा निर्णय 'ब्रेन डेड' घोषित झालेल्यांच्या निस्वार्थ बलिदानाचा सन्मान करतो, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. २००८ मध्ये ऑर्गन ट्रांसप्लांटला सुरुवात झाली तेव्हा सतराशेहून अधिक जण अवयदानासाठी पुढे आले होते. तामिळनाडूत आतापर्यंत सहा हजारहून अधिक रुग्णांचे अवयवदान करण्यात आले आहे. यामध्ये हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत, आतडे, कॉर्निया, हाडे, त्वचा इत्यांदी अवयवांचा समावेश आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूChief Ministerमुख्यमंत्री