mk stalin dhoni | नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा जगभरात चाहतावर्ग आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याचे स्थान अद्याप तसेच आहे. धोनीच्या चाहत्यांमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा देखील समावेश आहे. एका कार्यक्रमात बोलताना स्टॅलिन यांनी धोनीचे तोंडभरून कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी धोनीचे कौतुक करताना आयपीएलमधून निवृत्त न होण्याची विनंती केली.
मी धोनीचा मोठा चाहता - स्टॅलिनतामिळनाडू चॅम्पियन्स फाउंडेशन आणि मुख्यमंत्री ट्रॉफीचा लोगो लॉन्च करताना स्टॅलिन यांनी म्हटले, "सगळ्यांसारखा मी देखील महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे. मला आशा आहे की, तामिळनाडूचा हा 'दत्तक' सुपत्र चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणे सुरूच ठेवेल. तो भारतातील लाखो युवकांसाठी एक प्रेरणा आहे."
तामिळनाडूत अनेक धोनी तयार व्हावेत - स्टॅलिनमुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी धोनीचे कौतुक करताना राज्यातील खेळाडूंचा उत्साह वाढवला. "महेंद्रसिंग धोनी भारतातील लाखो युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. आम्हाला तामिळनाडूतून केवळ क्रिकेटमधूनच नाहीतर इतर खेळांमधून देखील अनेक धोनी तयार करायचे आहेत." खरं तर धोनी ४१व्या वर्षी देखील आयपीएल खेळत आहे.
"धोनी RCBचा कर्णधार असता तर त्यांनी ३ वेळा ट्रॉफी जिंकली असती", वसिम अक्रमचं अजब विधान
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची विजयी घौडदौडआयपीएलच्या सोळाव्या हंगामात देखील धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. हा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत, तर धोनीच्या संघाला ४ सामने गमवावे लागले आहेत. १३ गुणांसह चेन्नई सुपर किंग्ज आताच्या घडीला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"