चेन्नई - केंद्र सरकारनं पॉक्सो कायद्यात दुरुस्ती केली असून, त्या वटहुकूमावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्यामुळे आता 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणा-याला फाशीची शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलीवर आत्याचार करणाऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा करण्याच्या तरतूद होत असाताना भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नेत्याने धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे. आरोपीचे नाव प्रेम अनंत असे आहे. ते पेशाने वकिल असून त्याने 2006 मध्ये भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली आहे. सध्या प्रेम अनंतरकडे भाजपाचे कोणतेही पद नाही. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी प्रेम अनंतवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या मते या घटनेनंतर प्रेम अनंत भाजपा आणि आरएसएस नेत्यांशी माझा संपर्क आहे असे सांगत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी प्रेम आनंत यांना अटक केली आहे.
10 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसोबत तिरुवनंतपुरमहून चेन्नईला जात होती. रात्री सर्व प्रवाशी झोपले असल्याचे पाहून आरोपी त्या चिमुरडीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर स्पर्श करत होता. त्यावेळी ती चिमुरडीने जोरात ओरडायला सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकताच ट्रेनमधील लोकांनी ओरपीला पडकले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत प्रेम अनंतवर गुन्हा दाखल केला.