चेन्नईः सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारनं महिलांनी साडी किंवा सलवार-कमीज परिधान करून कामावर यावं, असं फर्मान काढलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या ड्रेस कोडची सर्वत्रच चर्चा आहे. त्यामुळे आता इतर कोणत्याही कपड्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर येता येणार नाही. भारतीय परंपरेची झलक सरकारी कार्यालयातही पाहायला मिळावी, या उद्देशानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे.एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडू सरकारनं एक आदेश जारी केला आहे. त्या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. महिला कार्यालयात साडी, सलवार-कमीज आणि चुडीदार दुपट्टा परिधान करू शकतात. तर पुरुषांनी शर्ट-पँट किंवा पाश्चिमात्य कपडे परिधान करू शकतात. याशिवाय कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये इतर कोणत्याची प्रकारचे कपडे परिधान करण्यास अनुमती नाही. सरकारच्या या आदेशवर आता चहूबाजूंनी टीका केली जात आहे.
कामावर महिलांनी साडी किंवा सलवार-कमीजच परिधान करावी, सरकारचं नवं फर्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 10:48 AM