शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Fuel Hike : मित्रांनी नवरदेवाला दिलं एवढं 'महागडं' गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 1:57 PM

Fuel Hike : तामिळनाडूमध्ये एका लग्नसोहळ्यात मित्रांनी मिळून नवरदेवाला महागडे गिफ्ट द्यायचे म्हणून गिफ्ट म्हणून चक्क हे दिले...

तामिळनाडू : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोज वाढणाऱ्या डिझेलपेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. या परिस्थितीत तुम्हाला कोणी पेट्रोल गिफ्ट म्हणून दिले तर... केवळ विचारानंच तुमचा आनंद गगना मावेनासा झालाय ना?... पण तामिळनाडूमध्ये एका लग्नसोहळ्यात मित्रांनी मिळून नवरदेवाला महागडे गिफ्ट द्यायचे म्हणून चक्क पाच लिटर पेट्रोल दिले आहे.

(मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं, महागाईची झळ बसतच नाही - रामदास आठवले)

तामिळनाडूतील वृत्तवाहिनी ‘पुथिया तलाईमुरई’नं दिलेल्या वाहितीनुसार, एका लग्न समारंभात नवरदेवाच्या मित्रांनी पेट्रोलने भरलेला कॅन गिफ्ट केला आणि हे पाहून पाहुणेमंडळींना हसू आवरेच ना. दरम्यान, आज पुन्हा इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.तामिळनाडूमध्ये पेट्रोलचे प्रति लिटर दर 85.15 रुपये एवढे झाले आहेत.  

(कर्नाटकमध्ये पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त)

दुसरीकडे, कर्नाटक सरकारने जनतेसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. राजस्थान, आंध्र प्रदेशनंतर आता कर्नाटकात पेट्रोलडिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी दोन रुपयाने कपात केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त करत असल्याची घोषणा केली. काँग्रेसने भाजपावर इंधन दरवाढीवरून हल्ला चढवला आहे. 'आमच्या सरकारने राज्यात इंधनाचे दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आज मोदींचा वाढदिवस असल्याने त्यांच्यासाठी ही वाढदिवसाची भेट आहे', असा टोला लगावतानाच 'जर राज्य सरकार इंधन दर कमी करू शकते तर केंद्र सरकार इंधन दरात कपात का करत नाही?,' असा सवाल काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी केला.

 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढTamilnaduतामिळनाडूPetrolपेट्रोलDieselडिझेल