शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

VIDEO : वॉटरफॉलमध्ये अचानक आला पूर, पाण्यात अडकलेल्या आई-मुलाला असं वाचवलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 6:03 PM

Anaivari Waterfalls Rescue : अनायवरी वॉटरफॉल सलेम जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते.

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) सालेम (Salem District) जिल्ह्यातील अनायवरी वॉटरफॉलमध्ये (Anaivari Waterfalls) एका महिला तिच्या लहान मुलासोबत अडकली होती. एकीकडे वेगाने वाहणारं पाणी आणि दुसरीकडे शेवाळ जमा झालेले मोठाले दगड होते. अशात आई आणि मुलाचं वाचणं अशक्य वाटत होतं. 

तेव्हाच फॉरेस्टच्या स्टाफकडून आणि काही लोकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनतर वॉटरफॉलमध्ये अडकलेल्या महिलेला आणि तिच्या मुलाला सुखरूप  बाहेर काढलं. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत बघू शकता की, रेस्क्यू ऑपरेशन किती खतरनाक होतं. आजूबाजूचे लोकही ओरडत होते.

असं सांगितलं जात आहे की, अनायवरी वॉटरफॉल सलेम जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. गेल्या रविवारी इथे लोक जमा झाले होते तेव्हा कलवरायण डोंगराजवळ मुसळधार पाऊस झाल्याने वॉटरफॉलची पाण्याची पातळी वाढली होती. हे अचानक झाल्याने अनेक लोकांना स्वत:ला सांभाळण्याची संधीच मिळाली नाही.

वॉटरफॉलची पाण्याची पातळी वाढली तेव्हा एक महिला आणि तिचा मुलगा एका खडकावर अडकले होते. या दगडांवर मोठ्या प्रमाणात शेवाळ होतं. त्यामुळे सहजासहजी त्यावर चढता येत नव्हतं. तेव्हा ती मदतीसाठी आवाज देऊ लागली होती. तेव्हाच दोन व्यक्तींनी हिंमत दाखवत आई-मुलाला वाचवलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून महिला आणि तिच्या मुलाला वाचवणाऱ्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके