कोईम्बतूर- कोईम्बतूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. कोईम्बतूर 1998 च्या बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या मोहम्मद रफिक पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. मोहम्मद रफिकने एका ट्रकचालकाशी फोनवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा उल्लेख केला होता. आठ मिनिटांची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रफिकला अटक केली आहे. अटक केलेला आरोपी रफिक याने बॉम्बस्फोट प्रकरणाची शिक्षा पूर्ण केली असून तो सध्या कुनियामुत्थूर येथे राहत होता. तेथे तो ट्रान्सपोर्टाचा व्यावसाय करतो.
रफिक काही दिवसांपूर्वी ट्रकचालक प्रकाशशी फोनवर बोलत होता. नवीन गाड्यांच्या खर्चाबाबत त्या दोघांमघ्ये चर्चा सुरु होती. पण, चर्चेदरम्यान रफिकने अचनाक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलायला सुरूवात केली. ‘१९९८ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या कोईम्बतूर भेटीदरम्यान ज्याने बॉम्ब ठेवला होता त्याची मदत मी घेणार आहे. नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं त्याने प्रकाशला सांगितलं. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सालेम आणि परिसरात व्हायरल झाली होती. अखेर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली.
फेब्रुवारी 1998मध्ये कोईम्बतूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 58 लोकांचा मृत्यू झाला होता तर करोडो रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं.