तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलीन यांचे पुत्र तथा DMK नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, आता भाजपनेही पलटवार केला आहे. तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष के. अन्नामलाई (K.Annamalai) यांनी गुरुवारी डीएमकेवर थेट हल्ला चढवला. त्यांनी DMK चा नवा फुल फॉर्म सांगत, डीएमकेची तुलना 'डेंग्यू, मलेरिया आणि कोसु'सोबत केली आहे.
अन्नामलाई यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे, "जर तामिळनाडूतून एखादी गोष्ट संपुष्टात आणायची असेल, तर ती म्हणजे 'डीएमके'. डी म्हणजे डेंग्यू, एम म्हणजे मलेरिया आणि के म्हणजे कोसू." 'कोसू' हा तमिळ शब्दअसून, तो एखाद्या घातक आजाराशी संबंधित आहे. पुढे अन्नामलाई म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की, लोक हे घातक आजार डीएमकेशी जोडतील आणि त्यांना राज्यातून उखडून टाकण्याचा प्रयत्न करतील.
स्टॅलीन यांच्यावर हल्ला चढवत अन्नामलाई म्हणाले, मी आपल्याला आव्हान देतो, या येणाऱ्या निवडणुकीत 'सनातन धर्मा'च्या मुद्द्यावर लढू. डीएमकेचे म्हणणे आहे की, ते 'सनातन धर्म' नष्ट करणार आहे. आम्ही म्हणून, आम्ही संरक्षण करू आणि 'सनातन धर्म' सुरक्षित ठेवू. बघूया तामिळनाडूतील लोक कुणाला मतदान करतात? आम्हाला अनेक वर्षांपासून डीएमकेचे नाटक माहीत आहे.
राज्यातील जनता 'हे' काम करेल -अन्नामलाई म्हणाले, आपण सत्तेवर आल्यानंतर, पहिल्या वर्षी 'सनातन धर्मा'चा विरोध करता. दुसऱ्यावर्षी तो नष्ट करण्याची भाषा बोलता. तिसऱ्या वर्षी 'सनातन धर्मा'ला कृरपणे नष्ट करू इच्छिता. चौथ्या वर्षी म्हणता, आपण हिंदू आहात आणि पाचव्या वर्षी म्हणता, डीएमके पार्टीचे 90% लोक हिंदू आहेत. पाचव्या वर्षी म्हणता, आपण हिंदू आहात. 2024 मध्ये एक पक्ष म्हणून डीएमकेचा साफ होणार आहे. तसेच, मी हे म्हटले नाही की, तुमचा मुलगा असे यामुळे म्हणाला, कारण D चा अर्थ 'डेंग्यू', M चा अर्थ 'मलेरिया' आणि K चा अर्थ 'कोसू' होतो. राज्यातील जनता हे काम करेल, असेही अन्नामलाई म्हणाले.