ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 08 - अण्णाद्रमुकसाठी मंगळवार हा प्रचंड राजकीय उलथापालथीचा दिवस ठरला. रात्री उशिरा झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जयललितांच्या पक्षात शशिकला व पन्नीरसेल्वम असे दोन गट पडल्याचे दिसून आले. सोमवारी अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांची पक्ष विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काल रात्री पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडलं गेलं', असा आरोप केला. तसंच जनतेने आणि पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास आपण राजीनामा मागे घेऊ, असंही जाहीर केले, त्यानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप आल्याचे दिसून आले. पन्नीरसेल्वम यांच्या दाव्यानंतर शशिकलांनी लगेच पोएस गार्डनस्थित निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली. बैठकीनंतर शशिकला यांनी पक्षाच्या खजिनदार पदावरुन पनीरसेल्वम यांना हटवत त्यांच्याजागी डिंडीगुल श्रीनिवासन यांच्याकडे खजिनदार पद सोपवले आहे. तर पीटीआयच्या वृत्तानुसार पनीरसेल्वम यांनी पक्षाविरोधातील बंड थांबवावे अन्यथा त्यांना पक्षातून निलंबित करण्याच येईल असा इशारा शशिकला यांनी दिला आहे. या बैठकीत अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांसह बहुतांशी आमदार उपस्थित होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास शशिकला यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पनीरसेल्वम यांच्यावर निशाणा साधला. पक्षातील आमदारांमध्ये एकजूट असून पनीरसेल्वम यांना पक्षात ठेवता कामा नये अशी आमदारांनी भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितलेमी अण्णा द्रमुक पक्षाचा कट्टर समर्थक आहे, त्यामुळे प्रतीक्षा करा आणि उद्या काय होईल ते पाहा असे विधान पनीरसेल्वम यांनी रात्री उशीरा केले आहे. त्यामुळे पनीरसेल्वम यांच्या हलचालीकडे सर्वच देशाचे लक्ष लागले आहे. काल रात्री तामिळनाडूच्या राजकीकारणात विविध घटना घडल्या अण्णा द्रमुक पक्षाचे राज्यसभा खासदार व्ही मायत्रेयन यांनी ओ. पनीरसेल्वम यांच्यानिवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर विरोधी पक्ष डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी पनीरसेल्वम यांच्यावर दबाब आणि धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे अवाहन केले आहे. काल रात्री पक्ष कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांना कुठलीही माहिती न देता पन्नीरसेल्वम अचानक चेन्नईच्या मरीना बीचवरील एमजीआर मेमोरिअल येथे जयललिता यांच्या स्मारकासमोर जाऊन आत्मचिंतनाला बसले. ते किमान ४० मिनिटं डोळे मिटून बसले होते. त्यानंतर पत्रकारांना सामोरे जाताना त्यांनी पक्षातील नेत्यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितल्याने हा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट केला. मला मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. मात्र, नेहमी अपमानजनक वागणूक मिळत होती, असा खुलासाही यावेळी पन्निरसेल्वम यांनी केला.३३ वर्षे एखाद्या बरोबर राहणे ही मुख्यमंत्रिपदाची पात्रता ठरत नाही, अशी टीका जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी केली आहे. तसेच जयललिता यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसल्याचा आरोप ही त्यांनी केला.
तामिळनाडूत 'रात्रीस खेळ चाले', पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी?
By admin | Published: February 08, 2017 6:47 AM