कमी दाबाच्या प्याने तामिळनाडूत पाऊस
By admin | Published: November 15, 2015 11:13 PM
पुणे : नैऋत्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र आता नैऋत्य बंगालचा उपसागर व श्रीलंकेच्या लगतच्या मागावर आहे़ त्यामुळे तामिळनाडू व पाँडेचरी येथे मुसळधार पाऊस पडत आहे़ संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते़ नाशिक येथे राज्यातील सर्वात कमाल तापमान १३़४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़बंगालच्या उपसागरात निर्माण ...
पुणे : नैऋत्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र आता नैऋत्य बंगालचा उपसागर व श्रीलंकेच्या लगतच्या मागावर आहे़ त्यामुळे तामिळनाडू व पाँडेचरी येथे मुसळधार पाऊस पडत आहे़ संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते़ नाशिक येथे राज्यातील सर्वात कमाल तापमान १३़४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्याने गेल्या तीन दिवसांपासून दक्षिणेत पाऊस पडत आहे़ चिन्नई, पाँडेचरी, तिरुपती, तिरुअनंतपुरम, वेल्ल्होर, धर्मपूरी, नागापणम तसेच दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला़ येत्या २४ तासात तामिळनाडू व पाँडेचरीला मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़राज्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहिल़ १८ व १९ नोव्हेंबरला दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ १८ व १९ नोव्हेंबरला पुणे शहर व परिसरातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे़