बनारसला गंगेच्या काठी घडलेल्या एका अद्वितीय आयुष्याची सफर : गिरिजा देवीवडिलांची इच्छा म्हणून गाणे शिकायला निमुटपणे गुरूपुढे बसलेली माझ्यासारखी मुलगी मशहूर गायिका, प्रसिद्ध कलाकार वगैरे होइल, असे स्वप्नसुद्धा मला कधी पडले नसेल..! शाळेचे फारसे तोंड न बघितलेली, आईचा मार खात घरीच हिंदी, संस्कृतचे धडे घेणारी, घोड्यावर मांड ठोकून त्याला पळवणारी आणि रोज हौशी-हौशीने गुडीयाकी शादी मनानेवली बनारसची एक सिधी लडकी होते मी...! - मला बंडखोरी शिकवली मीरेने! स्वरांच्या प्रेमात बुडून जायला शिकवले सूरदासाने आणि माझे गाणे घेऊन जगण्यात उतरायला शिकवले ते आमच्या काशी-विश्वेश्वराने. त्याने मला माझे गाणे माझ्या जगण्याशी जोडून द्यायला शिकवले.
तडप तडप जिया जाये...
By admin | Published: October 15, 2016 12:02 AM