११ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा टंचाईच्या झळा : जिल्हा प्रशासनाकडे आले अनेक गावांचे प्रस्ताव
By admin | Published: December 28, 2015 12:06 AM
जळगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. जिल्हा प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यापासून तब्बल ११ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त होत आहे.
जळगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. जिल्हा प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यापासून तब्बल ११ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त होत आहे.अमळनेर, पारोळा व जळगाव तालुक्यात टंचाईच्या झळाजिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात टंचाई आराखडा तयार केला आहे. तसेच पाणी आरक्षण बैठक घेत आगामी काळातील पाणी टंचाईच्या निवारणासाठी उपाययोजना देखील केल्या आहेत. सद्यस्थितीला जिल्हा प्रशासनाकडे पारोळा तालुक्यातील वरखेडेसिम, वागरा-वगारी, पोपटनगर, दिहू, भंडणीकर व मंगरुळ या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, भोरखेड, कटारे व वामरे तर जळगाव तालुक्यातील देव्हारी या गावात टँकर सुरु करण्यात आले आहेत.टंचाई निवारणासाठी येताहेत प्रशासनाकडे प्रस्तावयावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा परिणाम हा कृषी उत्पन्नावर झाला. मात्र त्याच सोबत पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील निर्माण झाली. जिल्ह्यातील ५२६ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती राहिल अशी शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यानुसार टंचाई भासणार्या गावांचे तीन टप्प्यात नियोजन केले आहे. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात ४५ गावांचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च २०१६ या दरम्यान १२२ गावांमध्ये तर एप्रिल ते जून २०१६ या काळात ३५९ गावांमध्ये पाणी टंचाई भासणार आहे. सध्या ११ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा होत असताना अन्य ग्रामपंचायतीतर्फे टंचाई निवारणाच्या संदर्भात प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले जात आहे. त्यानुसार विहिर खोलीकरण, खाजगी विहिर ताब्यात घेणे यासारखे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडून पाठविण्यात येत आहे.