ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याने महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सोशल मीडियावरुन मोदींवर निशाना साधला आहे. स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान न देणारे खादीचे महत्त्व समजू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तेरा चरख़ा ले गया चोर, सूनले बापु ये पैग़ाम, मेरी चीट्ठी तेरे नाम असे उपासाहत्मक ट्विट करत तुषार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर नाराजी व्यक्त केली आहे.
खादी-ग्रामोद्योग आयोगाने बापू आणि खादी यांचा वारसा कमजोर केला आहे. आता खादी-ग्रामोद्योग आयोगाला महात्मा गांधीनी रामराम करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत तुषार गांधी यांनी नाराजी व्यक्त करत खादी ग्रामोद्योग आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
'तेरा चरख़ा ले गया चोर,सूनले बापु ये पैग़ाम, मेरी चीट्ठी तेरे नाम....'— Tushar (@TusharG) January 12, 2017
Replacing Bapu's photo from KVIC Callander & diary with million ₹ ka suit loving PM's is a tongue in cheek taunt by ministry.— Tushar (@TusharG) January 12, 2017
'तेरी तकली ठगोने ठगली, तेरी बकरी ले गया चोर। सूनले बापू ये पैग़ाम मेरी चीट्ठी तेरे नाम, चीट्ठीमें सबसे पेहेले लीखता तूजको राम राम.....'— Tushar (@TusharG) January 13, 2017