कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशानंतर आता भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महत्त्वाची रणनीती आखत आहे. एक म्हणजे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या जनाधार असलेल्या नेत्यांना आपल्या पार्टीत सामील करुन घेत आहे. तर दुसरे म्हणजे खालच्या पातळीवर आपले संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी 294 जागा आहेत. त्यामुळे भाजपाने 'मिशन 250' चे लक्ष्य ठेवले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपाने तृणमूल काँग्रेसला चांगलीच टक्कर देत 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फक्त 22 जागा मिळाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत 40.5 टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस भाजपाच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जास्त महत्व देत नाही. तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की, 'पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपाचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नाही.' दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला 40.5 टक्के मतदान झाले आहे. तर, राज्यात विधानसभेच्या सहा जागा भाजपाच्या आहेत.
250 जागांचे लक्ष्यभाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांना सांगितले की, 'लोकसभेच्या जागांसाठी आम्ही 23 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र 18 जागांवर विजय मिळाला. आता राज्यात विधानसभेच्या 250 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.